सातार्‍यात दोन्ही राजांचे एक्के रिंगणाबाहेरच

खेड;  : सातारा तालुक्यात गट-गणांच्या आरक्षणामुळे राजकीय गोटात बराच गलबला झाला आहे. दोन्ही राजांचे एक्के रिंगणाबाहेर राहणार असून त्यांचा चांगलाच लोचा झाला आहे. राजू भोसले, विक्रम पवार, सुनील काटकर, रवी साळुंखे, बाळासाहेब चोरगे, संदीप शिंदे अशा अनेकांना मैदानाबाहेर राहण्याची वेळ आली आहे. राजेंच्या आजूबाजूला रोज वावरणार्‍यांना घरी बसण्याची तर काहींना अन्य गट, गण शोधण्याची वेळ आली आहे. विद्यमानांपैकी प्रतिक कदम, अनिता चोरगे यांना आरक्षणाचा फटका बसला आहे तर भाजपमधून मनोज घोरपडे यांना पुन्हा संधी मिळू शकते. काही विद्यमान सदस्यांना ‘सौं’ना उतरवण्यासाठी फिल्डिंग लावावी लागणार आहे. काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशनही होणार असून तालुक्यात अनेक ठिकाणी दोन्ही राजे भाकर्‍या फिरवणार असून नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार आहे.

सातारा तालुक्यातील राजकीय गणिते आरक्षणामुळे बदलली आहेत. अनेक मातब्बरांना आता पुन्हा संधी मिळणार नसून दोन्ही राजे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. लिंब गट महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्य प्रतिक कदम यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. राजकीय हक्क सोडायचा नसेल तर त्यांना कुटुंबातील महिलेला मैदानात उतरवावे लागणार आहे. लिंब गणासाठी पं. स. चे माजी उपसभापती जितेंद्र सावंत व पानमळेवाडी गणासाठी माजी सभापती सरिता इंदलकर यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

पाटखळ गण व गटामध्ये महिलाराज आले असून या गटात माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे दावेदार आहेत. तर पं. स. सदस्य राहुल शिंदे हे सौ. च्यासाठी फिल्डिंग लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गणात वाढेच्या मेघा नलावडे देखील मुख्य दावेदार असू शकतात. शिवथर गणात यावेळी आरक्षण बदलले असल्याने नवीन चेहर्‍यांना संधी मिळू शकते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला