काॅलगर्ल्स पुरविणाऱ्याला सातारा पोलिसांकडून अटक : कास मार्गावरील हाॅटेलवर छापा

कास  ; पर्यटकांचे हिल स्टेशन असलेल्या कास रोडवरील एका रिसॉर्टवर पोलीसांनी रात्री उशिरा छापा टाकला. यामध्ये काॅलगर्ल्स पुरविणाऱ्या एकाला ताब्यात घेतले असून रिसाॅर्ट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी दोन देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती सातारा तालुका पोलिस यांनी दिली.
सातारा तालुक्यातील गाजत असलेल्या कास पठारावरील बेकायदेशीर हॉटेलचे प्रकरण गाजत आहे. अशातच सातारा पोलीसांनी एका रिसॉर्टवर अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळाली होती. काॅलगर्ल्स पुरविणारा इसमास सातारा तालुका पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभाग सातारा यांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. सदरील, घटना शुक्रवारी रात्री उशिरा झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
कास पठारावरील अनेक हॉटेल धारकांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी कास पठारावरील त्या बेकायदेशीर हॉटेलवर तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागला आहे. तसेच जे हाॅटेल धारक गैरप्रकार करत असतील त्याच्यावर कारवाई करावी.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला