वर्णे वि.का.स सेवा सोसायटीवर भैरवनाथ पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

देशमुखनगर: नुकत्याच पार पडलेल्या वर्णे विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत स्वर्गीय जयसिंग गुरुजींच्या भैरवनाथ पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मताधिक्याने निवडून आले.
तत्पूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून विजयाचा शुभारंभ केला .

शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेता गट तट बाजूला ठेवून ,सर्वपक्षीय व समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मूळ भैरवनाथ पॅनलची चाळीस वर्षाची असलेली अपराजित परंपरा कायम ठेवत ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुणांच्या परिश्रमावर वर्णे विकास सेवा सोसायटीचा अभेद्य गड  राखण्यात भैरवनाथ पॅनल यशस्वी  झाले .
निवडणुकीला सामोरे जात असता सभासदांसमोर ठेवलेला जाहीरनामा व संस्थेचा आज अखेर केलेला कारभार यावर जनतेने विश्वास ठेवून मतपेटीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला . या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून किशोर पवार, किरण पवार , युवराज पवार ,
नितीन जाधव , शिवाजी पवार, अभिजीत पवार , काशिनाथ सपकाळ, रणजीत पवार तर
महिला राखीव मतदार संघातून अर्चना पवार , उषा पवार  व 
नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदार संघातून सदाशिव कुंभार , अनुसूचित जाती मतदारसंघातून भीमराव धसके ,
भटक्या विमुक्त मतदार संघातून दत्तात्रय मदने भरघोस मतांनी निवडून आले .
सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सूपेकर यांनी चोख पार पाडली.
नवनिर्वाचित सर्व उमेदवारांवर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला