शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत
Satara News Team
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
- बातमी शेयर करा

सातारा : शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळला असून चोरीचा गुन्हा उघड करुन 6,44,970/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि शाहुपूरी पोलीस ठाणे मध्ये दि. 18/08/2023 रोजी चोरीची तक्रार प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. 309/2023 भादविसं कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. बाजारपेठेतील चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना सदरचा गुन्हा उघकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
दि.08/09/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणपती उत्सव अनुषंगाने राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक अशा परिसरात गर्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना 4 संशयीत महिला फिरत असल्याचे दिसुन आल्या. त्यांचेवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी बारकाईने लक्ष ठेवुन शाहुपुरी पोलीस ठाणे गुरनं. 309/2023 मधील प्राप्त असलेलेसी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर फुटेजमधील दोन महिला या फुटेजमधील असल्याची खात्री झाल्याने महिला सहा.पोलीस निरीक्षक श्रीमती श्रधा आंबले, प्रियांका बाबर व महिला अंमलदार यांची मदत घेवुन सदर ठिकाणी 4 संशयीत महिलांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने बाजार पेठेत फिरत असल्याचे सांगितले त्याचें सोबतआणखी 2 पुरुष साथीदार वाढे फाटा याठिकाणी चारचाकी वाहन घेवुन थांबले असल्याचे सांगितले. सदर महिलांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे 2 पुरुष साथीदार यांना मोबाईल लोकेशनच्या आधारे ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस हजर केले असता त्यांनी वरील 4 महिलांच्या आधारे सन 2023 मधे चोरी केल्याचे कबुल केले. तसेच ते संगणमताने अशाच प्रकारचे गुन्हे करीत असलेबाबत कबुल केले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. कृष्णा गुरव हे करीत आहेत.
अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने बाजार पेठेत चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील 4 महिला व 2 पुरुष यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन 6 मोबाईल, गुन्ह्यात वापरत असलेले वाहन व रोख रक्कम असा एकुण 6,44,970/- रुपये किंमतीचा मुद्देमला हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघकीस आणला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती श्रधा आंबले व श्रीमती प्रियांका बाबर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, निलेश काटकर, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, महिला पोलीस अंमदार सोनाली माने, धनश्री यादव, तनुजा शेख, शकुंतला पाटोळे, कोमल पवार यांनी केली आहे.
आरोपींची नावे :
१) अलताप सय्यद पठाण वय. 24 वर्षे रा. विहा मांडवा ता. पैठण जि. संभाजीनगर
२)रमेश बाबासाहेब काळे वय. 34 वर्षे रा. येळंबघाट ता. जि. बीड
३) जान्हवी अंगद पवार वय. 28 वर्षे रा. रामगव्हाण ता. अंबट जि. जालना
४) बरका सचिन पवार वय. 28 वर्षे रा. वाडेगोद्री ता. अंबट जि. जालना
५)गवरी रामदास भोसले वय 27 वर्षे रा. गेवराई ता. जि. बीड
६) सुरेखा ज्ञानेश्वर काळे वय 23 वर्षे रा. वाडेगोद्री ता. अंबट जि. जालना
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 12th Sep 2024 03:42 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 12th Sep 2024 03:42 pm