तत्कालीन पोनि पद्माकर घनवट व पोलीस विजय शिर्के यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

सातारा : सातार्‍यातील गुरुकुल स्कूल शिक्षण संस्था चालकांना विनाकारण त्रास दिल्याप्रकरणी सातारा एलसीबीचे तत्कालीन पोनि पद्माकर घनवट व पोलीस विजय शिर्के यांनी त्रास दिल्याचा आरोप करत राजेंद्र चोरगे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. दरम्यान, यानुसार या दोघांवरही गुन्हा दाखल झाल्यामुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 2017 साली चोरगे कुटुंबिय व शाळा प्रशासनाला एलसीबी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप चोरगे यांनी केला. यानंतर डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन एसपी पंकज देशुमख यांच्याकडे चोरगे यांनी घनवट व शिर्के यांच्या विरुध्द तक्रार अर्ज केला. या अर्जासोबत चोरगे यांनी पोलिसांनी कशा पध्दतीने राजेंद्र चोरगे, त्यांची पत्नी व कर्मचारी यांना ताब्यात ठेऊन कलम 395 दरोडा च्या गुन्ह्यात आरोपींना मदत करणे, खंडणी घेणे, भीती घालून पैसे घेणे, कोर्टातील रजिस्टर मधील कागद बेकायदेशीररित्या दमदाटी देऊन पोलीस कर्मचार्‍यांना फाडायला लावणे, आरोपींना 3 कोटी देण्यासाठी भीती घालणे, मोबाईल जबरदस्तीने घेणे अशा प्रकारचा त्रास देवून पैसे मागितले आहेत, याचे पुरावे देखील दिले. या प्रकरणी दोन्ही पोलिसांची एकूण पाच अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. 

मात्र दोन्ही पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजेंद्र चोरगे करत होते. गुन्हा दाखल होत नसल्याने जानेवारी 2023 मध्ये सातारा न्यायालयात प्रायव्हेट तक्रार दाखल करण्यात आली. कोर्टाने ही तक्रार पाहून सीआरपीसी 1973 चे कलम 156 (3) प्रमाणे या प्रकरणाचा तपास करुन या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम 342, 392, 384, 193, 201, 34, 120 ब, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7, 13, 13 (1) (ड)  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला