वडुथला मंडलाधिकारी देता का? मंडल अधिकारी

सातारा : शिवथर.वडुथ ता, सातारा येथे गेले कित्येक दिवस मंडल अधिकारी नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची कोंडी झाले आहे जून महिन्यांमध्ये सोसायटीचे नवे जुने कर्ज प्रकरण चालू असतात त्यामध्ये एखादा मयत शेतकरी झाल्या त्याच्या वारसांच्या नोंदी रखडल्याने मंडलाधिकारीच नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना संतप्त शेतकऱ्यांमधून कोणी मंडलाधिकारी देता का असा सवाल उपस्थित होत आहे
      वडूथ मंडल कार्यक्षेत्रामध्ये आर फळ शिवथर नाळेवाडी मालगाव बोरखळ आरळे वडूथ बसप्पाचीवाडी पाटखळ गावे आहेत या गावातील शेतकऱ्यांना मंडलाधिकारी वडूत या ठिकाणी असल्याने तेच कार्यालयामध्ये हजर नसतात त्यामुळे तलाठी हात वर करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मंडलाधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची तरी सातारा तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी तातडीने कायमस्वरूपी मंडलाधिकारी नेमून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मदत करावी अशी माफक मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे
        वडूथ मंडल ऑफिस बंद असल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत त्या ठिकाणी साधा फलक सुद्धा मंडलाधिकारी नसल्याचा न लावल्याने मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे संबंधित विभागाने तातडीने मंडलाधिकारी उपस्थित करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला