जावली गावाच्या हद्दीत एसटीची दोन चाके निखळली.

बामणोली  : कास-बामणोली या दुर्गम भागातील एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. अशीच एक घटना नुकतीच सावरी तालुका जावली गावाच्या हद्दीमध्ये घडली. गोगवे सातारा बसची दोन चाके निखळून गेल्यामुळे भीषण अपघात होता होता वाचला. 

दैव बलवत्तर म्हणूनच एसटीतील प्रवासी सुखरूप राहिले. सातारा एसटी आगारातून पहाटेे साडेपाच वाजता सुटणारी सातारा- कास – बामणोली – तेटली-गोगवे या एसटी बसला गोगवे होऊन परत माघारी सातारकडे येत असताना सावरी गावामध्ये अपघात झाला. सुदैवानेे कोणतीही जीवितहानी झाली नसून एसटी बसची पाठीमागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून पडली. एक चाक निखळल्यानंतर प्रसंगावधान राखत चालकाने तशीच एसटी पुढे काही अंतरावर आणली होती. त्यावेळी दुसरे चाक देखील फाटून पूर्णपणे काळेश्वरी मंदिरानजिक आल्यानंतर निखळून पडले. 

हा संपूर्ण भाग डोंगराळ व वळणा वळणाचा घाटमाथ्याचा असल्याने या भागात सुस्थितीत चांगल्या एसटी बसेस पाठवण्यात याव्यात, अशी वारंवार मागणी होऊन देखील या भागांमध्ये नादुरुस्त भंगार झालेल्या बसेस पाठवल्या जात आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला