औंध महाविद्यालयात जागतीक पर्यावरण दिन साजरा

औंध : औंध (सातारा) येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातील पदव्यूत्तर भूगोलशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबीनार च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्लोबल वॉर्मिग व हवामान बदल या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.  साधन व्यक्ती टी सी कॉलेज, बारामती येथील सहयोगी प्राध्यापक डॉ अरुण मगर यांनी विकासाच्या नावाखाली होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वसुंधरेचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून स्पष्ट केले. जागतीक तापमान वाढ धोकादायक असून हवामान बदलातील संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी आयपीसीसीच्या संकेतस्थळावरील सांखिकी माहिती अधिकृत समजावी व समाज माध्यमातील सुमार माहितीवर विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन केले. संयुक्त राष्ट्रांच्या सन २०२३ मधील हेतू प्लॅस्टिक प्रदूषण थांबवा मोहिमेवर त्यांनी दृष्टीक्षेप टाकला. व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 
 वेबिनारचे समन्वयक प्रा डॉ तेलोरे एन व्ही यांनी सूत्रसंचालन केले. डॉ भंडारे एस जे यांनी साधन व्यक्तीची ओळख करून दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ सावंत एस एस यांनी प्लास्टिक पासून होत असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद केले. डॉ बरकडे जे डी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन प्रा शिंदे एस एम, प्रा मुल्ला एस आर व डॉ भोसले एस आर व डॉ. श्रीशैल कोरे यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला