परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची विशेष उपस्थितीSatara News Team
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
- बातमी शेयर करा
फलटण : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण तालुका यांच्यावतीने परंपरागत अक्षय तृतीयेच्या तिथीनुसार शिवजयंती उत्सवात दुचाकी रॅलीच्या प्रारंभाने मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मालोजीराजे नाईक निंबाळकर स्मारक शंभूतीर्थ फलटण येथून श्रीफळ वाढवून आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि या भव्य दुचाकी रॅलीला सुरुवात झाली.
फलटण शहर व तालुक्यातील बहुसंख्य युवावर्ग या दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होऊन पारंपारिक वेश धारण करून अत्यंत योग्य व सूक्ष्म नियोजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ फलटण येथे शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या रॅलीची सांगता शंभू तीर्थ येथे झाली. या दुचाकी रॅलीमध्ये शहरातील युवावर्ग सर्व शिवप्रेमी व सर्व आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते पारंपारिक वेशभूषेतील लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन करून शांततेत आणि शिवरायांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देत छत्रपतींचा जयजयकार करत ही दुचाकी रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 19th Apr 2026 01:57 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 19th Apr 2026 01:57 pm













