सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे ८ जुलैला प्रस्थान
Satara News Team
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव
येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने सोमवार ८ जुलै ते गुरूवार १८ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय केली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन, देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव व विश्वस्तांनी केले.
श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. सोमवारी ८ जुलैला सकाळी ७.३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होईल. सोमवार ८ जुलैला महिमानगड, मंगळवार ९ जुलै लोधवडे, बुधवार १० जुलै म्हसवड, गुरूवार ११ जुलै पिलीव, शुक्रवार १२ जुलै तांदूळवाडी, शनिवार १३ जुलै भाळवणी, रविवार १४ जुलै उपरी, सोमवार १५ जुलै वाखरी, मंगळवार १६ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. बुधवारी १७ जुलै चंद्रभागेत स्नान करून नगर प्रदक्षिणा होईल. गुरुवारी १८ जुलैला चंद्रभागा स्नान करून दुपारी एक नंतर दिंडी तीर्थक्षेत्र पुसेगावकडे ट्रकमधून प्रस्थान करेल.
दिंडी सोहळ्यादरम्यान ठीकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, हरिपाठ, दैनंदिन आरतीचा कार्यक्रम होईल. विश्वस्तांनी दिंडीच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागांची पाहणी करून उत्तमोत्तम नियोजन केले आहे. ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा अपघाती विमा उतरवला जाईल. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबुंची सोय केली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयिंसुविधायुक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्ट मार्फत केली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसठी ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.
#sevagirimaharaj
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 6th Jul 2024 12:34 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 6th Jul 2024 12:34 pm









