शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून

उंडाळे :  आमच्या शेताजवळचा कचरा उचलण्यास सांगितला होता तो का उचलला नाही ? असे असे म्हणत युवकाने उंडाळे ता .कराड येथील ग्रामपंचायत मालकीचा कचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर कचरा खाली करून परत जात असताना कचरा डेपो जवळच पेटवून दिला.या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अंकुश रामचंद्र मुळीक( वय३९) याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


 कराड पोलीसांनी दिलेली माहिती अशी, उंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ट्रॅक्टर वापरण्यात येतो. आठवड्यातून बुधवार व शनिवार असे दोन दिवस गावातील कचरा उचलला जातो पैकी आज बुधवारी सकाळी गावातील कचरा उचलून ट्रॅक्टर कचरा डेपोकडे कचरा खाली करून ट्रॅक्टर परत येत असताना अंकुश रामचंद्र मुळीक यांने आमच्या शेता जवळील नाल्या जवळचा कचरा का उचलला नाहीस म्हणून बरोबर आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीतील पेट्रोल ट्रॅक्टर वर टाकून ट्रॅक्टर पेटवून तेथून पोबारा झाला. यानंतर काही क्षणात ट्रॅक्टरनेही पेट घेतला काही क्षणात ट्रॅक्टर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला यामध्ये ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.


 ट्रॅक्टर पेटवून दिल्याने ग्रामपंचायतीचे कचरा उचलण्याचे काम ठप्प झाले परिणामी गावातील कचरा आता गावातच पडून राहण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान घटनेची माहिती होतच ग्रामपंचायतच्या सरपंच सौ संगीता माळी त्यांचे पती राहूल माळी,उपसरपंच अजित कदम, माजी उपसरपंच बापूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील या सर्व सदस्य घटनास्थळी धाव घेऊन घडलेली सर्व माहिती घेऊन कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आज विधानसभा निवडणूक असल्यामुळे पोलिसांचे संख्याबळ कमी असलेले केवळ गुन्हा नोंद करून घेण्यात आला आहे पण पुढील कारवाई बाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही परंतु सार्वजनिक मालमत्तेचे वैयक्तिक हितासाठी नुकसान केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने मुळीक याच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास कराड तालुका पोलीस करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त