वडूज येथील इंदिरानगर मधील पाण्याच्या टाकीने 'शोले' ची आठवण
त्या टाकीतील पाणी चार वर्षे होऊनही हाकेच्या अंतरावरील दलित वस्तीत पोहोचलेच नाहीSatara News Team
- Thu 30th Jun 2022 04:35 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज वडुज : अजित जगताप / :चार वर्षांपूर्वी खटाव तालुक्यातील वडूज नगरीत सुमारे छत्तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. परंतु, त्या टाकीतील पाणी चार वर्षे होऊनही हाकेच्या अंतरावरील दलित वस्तीत पोहोचलेच नाही. त्यामुळे या टाकीकडे पाहून अनेकांना 'शोले' हिंदी चित्रपटातील पाण्याच्या टाकीची आठवण होत आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाले. त्याच वेळी अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून १ कोटी ४७ लाख ५२हजार २८३ रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली.यामध्ये २० कामांचा समावेश करण्यात आला होता.सदरची काही कामे पूर्ण सुध्दा झाली आहेत .
इंदिरा नगर पिण्याच्या पाण्याची टाकी समवेत गटर व रस्ता डांबरीकरण मेनपाईप लाईन, रस्ता काँक्रीटीकरण, आर सी सी गटर बांधणे, जलवितरण व्यवस्था करणे आदि काही कामे पूर्ण झाली आहेत. पण, गेली चार वर्षांपासून काही प्रमाणात पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ण होऊ शकली नाही.निळ्या पाईप रस्त्यालगत दिसत होत्या. आता पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाल्याने निळ्या पाईप नुसत्याच लटकत आहेत. तर काही पाईप तुटून पडल्या असून भविष्यात रस्त्याची खोदाई करून काहींना जलवितरण व्यवस्था कार्यन्वित करावी लागणार आहे. असे चित्र दिसत आहे.
सदर पिण्याच्या पाण्याची टाकी२०१७-१८ साली बांधून पूर्ण झाली आहे तर २०१८-१९ साली जलवितरण होण्यासाठी इंदिरा नगर पाण्याची टाकी ते आदिनाथ नगर ते मातंग वस्ती मेन पाईपलाईन कामे झाली आहेत.येथील स्थानिक रहिवासी व रिपाइं सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजित नलावडे यांनी याबाबत वडूज नगर पंचायतीशी लेखी पत्रव्यवहार केला होता. पण, अध्याप काही घरात या टाकीचे पाणी पोहचू शकले नाही. 'शोले' चित्रपटात रामगड गावात पाण्याची टाकी दाखवली आहे. त्यावर चढून नायक धर्मेंद्र( बिरु) आंदोलन करीत असल्याचे चित्रीकरण आहे.पण, रामगड गावात वीज पुरवठा नसल्याने या टाकीत पाणी कसे चढणार? याचा नेमका शोले चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांना विसर पडला होता. तशी अवस्था वडूज मध्ये गेली चार वर्षे पाहण्यास मिळत आहे.
सध्या विकास कामांबाबत चांगलीच स्पर्धा होत असली तरी त्याचा फायदा होत आहे की नाही? याची सखोल चौकशी करण्यासाठी एखाद्या तज्ञांची समिती नेमण्याची वेळ आली आहे. असे सध्या तरी स्पष्टपणे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. रस्ता आधी की पाण्याची पाईप?हे कोडे सोडविण्यासाठी पुन्हा रस्त्याची खोदाई होऊ नये एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, याबाबत नगर पंचायत कार्यालयाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याबाबत नेमकी सत्य परिस्थिती समजू शकली नाही..
shole
khatav
water
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 30th Jun 2022 04:35 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 30th Jun 2022 04:35 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 30th Jun 2022 04:35 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 30th Jun 2022 04:35 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 30th Jun 2022 04:35 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 30th Jun 2022 04:35 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 30th Jun 2022 04:35 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 30th Jun 2022 04:35 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 30th Jun 2022 04:35 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 30th Jun 2022 04:35 am









