महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपाकडून मान्यता
Satara News Team
- Wed 7th Feb 2024 11:12 am
- बातमी शेयर करा

दहिवडी : - लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे .महायुतीतील घटकपक्ष म्हणून सहभाग नोदविण्यात आला आहे.
ॲड श्रीहरी बागल. राष्ट्रीय अध्यक्ष . राष्ट्रीय स्वराज्य सेना ( मराठा राजकीय पक्ष) रजि. नं .56/284/2018-19/PPS-i New DELHI ) हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांच्या प्रश्नावर कार्य करत असून महायुतीचा ' महाविजय २०२४' साकार करण्यासाठी सारे एकत्रित काम करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे यासाठी एकत्र येवून 'महाविजय २०२४ 'साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना ही कामाला लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रसाद लाड आमदार प्रतोद/ समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरु करुन कामालाही लागले आहेत.प्रत्येक जिल्हानिहाय मेळावे घेण्यास ही सुरुवात करत आहेत..महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले त्याबद्दल महायुती सरकार चे पुनश्च धन्यवाद व आभार व समाजातील काही घटकांना काही कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले भेटण्यास काही अडचणी असेल तर त्यांनी तेथील जिल्हा अध्यक्ष किंवा मला थेट संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड श्रीहरी बागल यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Wed 7th Feb 2024 11:12 am
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Wed 7th Feb 2024 11:12 am
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Wed 7th Feb 2024 11:12 am
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Wed 7th Feb 2024 11:12 am
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Wed 7th Feb 2024 11:12 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 7th Feb 2024 11:12 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 7th Feb 2024 11:12 am