होमाई कुपर फाउंडेशन तर्फे श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदा भेट__
Satara News Team
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 'कूपर कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड' चे H.R. माननीय श्री नितीन देशपांडे सर यांच्या सहकार्याने श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी 400 ग्रंथ भेट देण्यात आले व ग्रंथांची निगा ठेवण्यासाठी कपाट ही सप्रेम भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी कंपनीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती दर्शवलेले माननीय श्री खटावकर साहेब व माननीय श्री खरे साहेब यांनी आपल्या भाषणातून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच कूपर उद्योग समूहाला यशस्वी शंभर वर्षे पूर्ण झाले बद्दल वर्षभर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असलेची माहिती दिली.

तसेच शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव माननीय श्री तुषार पाटील सर यांनी देखील कूपर कुटुंबीय यांनी नेहमीच करंजे गावाला मदत केल्याचा तसेच त्यांनी करंजे येथील वैकूंठ अंत्यसंस्कार मंडळासाठी फार मोठी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले व कूपर उद्योग समूहाचे सहकार्याबद्दल धन्यवाद ही दिले.या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री किर्दत सर ,श्री जगताप सर ,संस्था सचिव माननीय श्री तुषार पाटील सर, संचालिका सौ. यादव मॅडम ,माजी विद्यार्थी गणेश किर्दत, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sat 21st Sep 2024 09:28 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sat 21st Sep 2024 09:28 pm











