ग्रामबीजोत्पादन गाव चिंचनेर निंब पर्यटनाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : तहसीलदार गायकवाड

देशमुखनगर : मोजे चिंचनेर निंब ता. सातारा येथे ग्रामस्थांनाच्या वतीने ग्रामबीजोत्पादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते. या कार्यशाळेला तहसीलदार सातारा श्री. नागेश गायकवाड व कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र बोरगाव, डॉ. महेश बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात विजय जाधव यांनी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून या गावात ०४ पिकांचे १० पेक्षा जास्त वाणाचे बीजोत्पादन घेऊन राज्यातील २६ जिल्हे व साधारणपणे इतर ०५ राज्यात दर्जेदार बियाणे पुरवठा करण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. त्या माध्यमातून गावात इतर राज्यातील शेतकरी भेटी देत असल्याचे नमूद केले. बीजोत्पादन श्री. विनोद डांगे यांनी सांगितले की गावात सेंद्रिय कृषि निविष्ठा मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात व पर्यटनासाठी उपलब्ध भोगोलिक संरचना त्यामध्ये सूर्यास्त ,यमाई मंदिराचे दर्शन जल क्रीडा या बाबत माहिती दिली.अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. गायकवाड म्हणाले की एकूणच गावाची भोगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत केलेल योगदान बघता सदर गावची कृषि पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नाव लौकिक व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असे मत व्यक्त केलं. पाहुण्यांचा स्वागत लेझीम पथक, दांडपट्टा पथक व ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. त्यानंतर प्रदर्शन स्थळी पाहुण्यांनी यांत्रिकीकरण,जैविक निविष्ठा , रेशीम उद्याग, विविध बियाणे, सुपरकेन रोपवाटिका इ. स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. महिला शेतकऱ्यांनी घट स्थापना करून काळ्या आईचे ऋण फेडण्याची संकल्पना मांडली. मान्यवरांचे हस्ते सूर्यास्त पाइंट वर वृक्षारोपण करण्यात आले.तद्नंतर कृषि सहाय्यक श्री. धनाजी फडते यांनी सोयाबीन बीजोत्पादन प्लॉट ला शिवार फेरी घेऊन सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन श्री. किशोर डांगे यांनी केले व आभार सोनाली यांनी केले. या कार्यशाळेला चिंचनेर परिसरातील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला