महाराष्ट्रात 2024 ला सुवर्णकाळ आणणार -आदित्य ठाकरे
सागर पाटील
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
- बातमी शेयर करा
ढेबेवाडी : 2024 हे वर्ष महत्त्वाचे असून महाराष्ट्र म्हणून आपण कोणत्या बाजूने निकाल देणार हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी हे गद्दार सरकार मुळासकट गाडले पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र मध्ये 2024 ला परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज रहा असे आव्हान शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
तळमावले तालुका पाटण येथे शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महामेळावा आयोजित झाला त्यामध्ये बोलत होते यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम पाटण तालुका शिवसेनाप्रमुख सचिन आचरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील, महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले खोक्याचे राजकारण करून सरकार पाडणाऱ्या 40 गद्दारांना गाढण्यासाठी जनतेने सज्ज रहावे या खोक्या सरकारने महाराष्ट्र मध्ये एक तरी उद्योग आणला का महाराष्ट्रात असलेले उद्योग बाहेर गुजरात ला नेहण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले, केंद्र सरकारने महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला असून , महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात योगदान असताना देखील महाराष्ट्र देशातच नाही अशी वागणूक केंद्राकडून दिली जात आहे, महाराष्ट्रावर एवढा राग का असा प्रश्न जनतेने ह्या खोके सरकारला विचारायला हवा , आंदोलने करणाऱ्यावर लाठी चार्ज करतात, हिम्मत नसलेले सरकार फक्त आश्वासना पलीकडे काहीच करू शकत नाहीत, असे सांगून म्हणाले आमचा मतदार संघ तालुका व जिल्हा पुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे हे गद्दार आमच्यावर कोठे आरोप करत आहेत, हे असले गद्दार आमदार आपणाला चालणार का याचा विचार जनतेने करावा असेही म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले स्वागत व प्रस्ताविक जिल्हाप्रमुख हर्षद कदम व आभार शिवसेना तालुकाप्रमुख सचिन आचरे यांनी केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 10th Jan 2024 07:18 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 10th Jan 2024 07:18 pm













