रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
अजित जगताप - Sat 11th Jul 2026 12:04 pm
- बातमी शेयर करा
सातारा सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध निधी खर्च केला जातो. काही ठिकाणी नागरी सुविधा ऐवजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने रुग्णांची हेळसांड होते. आता तर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क आरोग्यसेविकेलाच तक्रार देण्याची वेळ आली. अखेर सातारा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांना संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची घोषणा करावी लागली तर कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कदम यांची चौकशी सुरू झाली आहे.
रयतराज संघटना अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश कदम यांच्याकडून शासकीय औषधाची चोरी, सेवेत कार्यरत असताना खाजगी दवाखाना चालवणे, आरोग्य महिला कर्मचाऱ्यांचे गंभीर लैंगिक व मानसिक छळ करणे. याबाबतची लेखी तक्रार जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आली होती. नंतर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असतानाच बाहेर आंदोलकांनी आंदोलन सुरू केले.
रयतराज संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिता जाधव,उज्वला सुतार , राजश्री देशमुख, मंदाकिनी घोरपडे, राजश्री जाधव, पूनम कवळे, रेणुका पवार, रेखा खिलारी सविता कांबळे, रेश्मा आवळे,सत्यवान निमज ,महेश जाधव ,शशिकांत शिंदे ,भरत पिसाळ यांच्यासह आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. त्याची गंभीर दखल घेऊन अखेर सभागृहातच डॉ. प्रकाश कदम यांचे निलंबन व कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर अनिल कदम यांच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये ७१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कोळे तालुका कराड येथील वैद्यकीय अधिकारी ही चड्डी बनियानवर दवाखान्यात बसून महिला कर्मचाऱ्यांच्या बद्दल अपशब्द वापरतात. याचा पुरावा सादर करण्यात आला. या चड्डी बनियान घालून बसलेल्या वैद्यकीय अधिकारी कम रुग्णाचा उपचार करण्यासाठी अखेर रयतराज संघटनेने पुढाकार घेतला. आंदोलनाचे सलाईन लावल्यानंतरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना चूक समजली. तसेच जिल्हा परिषदेला कारवाई करणे सोपे झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय नव्हे तर इतर अनेक विभागाबद्दल आंदोलन व तक्रार केली जाते. परंतु त्या ठिकाणी सराईतपणाने वावरणारांना वेळेत भत्ता मिळत असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले जाते. याचा अनुभव घेतलेल्या रयतराव संघटनेच्या अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा मोका बघून आंदोलनाचा चौका मारला आहे. त्यामुळेच कडक कारवाई झाली आहे. अन्यथा हे प्रकरण सुद्धा दडपले असते. अशी चर्चा सुरू झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा सहा तास चालल्याने खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न व विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती करणे आवश्यक बाब बनलेली आहे. ग्रामीण भागात अनेक जिल्हा परिषदेच्या कार्यालयात चांगले काम करणाऱ्यांना कौतुक करण्यास आंदोलन विसरले नाहीत.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये तपासणी करूनच प्रवेश दिला . आणि आज सर्वसाधारण सभा सुरू असताना चौथ्या मजल्यापर्यंत आंदोलन पोहोचले. याबाबत ग्रामीण भाषेतच जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे यांनी घरचा आहेर दिला आहे. त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.


स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 11th Jul 2026 12:04 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sat 11th Jul 2026 12:04 pm









