औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल

पुसेसावळी : औंध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम कारवाईमुळे एका ट्रक चालकावर झालेल्या दरोडा व जबरदस्तीच्या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात एका आरोपीची ओळख पटवली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी सघन तपास सुरू ठेवला आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या अपुऱ्या माहितीनुसार, फिर्यादी सलमान बालेखान बागवान (वय ४०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १२.२० या दरम्यान मौजे वडी (ता. खटाव) येथील उड्डाणपुला पलीकडे पुसेसावळी-औंध रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या हुंदाई कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी कार त्यांच्या ट्रकला आडवी मारली. त्यांनी फिर्यादीवर हाताने मारहाण केली, लाकडी दांडके व रॉडने जीवे मारण्याची धमकी दिली आणि मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. “आम्ही साहेबांची माणसे आहोत. रस्त्यावर चालायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगत त्यांनी पासवर्ड विचारून फिर्यादीच्या मोबाइलमधून १० हजार रुपये त्यांच्या फोनपे/गुगल पे खात्यावर जबरदस्तीने ट्रान्सफर केले. याबाबत औंध पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्री २१.५५ वाजता (स्टेशन डायरी एंट्री क्र. ०९) गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४), १२६(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ अविनाश सदाशिव साठे (सदर बाजार, सातारा) यांची ओळख पटली असून उर्वरित आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. तपासी अधिकारी एस. डी. जानकर (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. परंतू या दाखल गुन्ह्या मधील फिर्यादी चे वाहनाचे प्रकार कोणते आणि त्याचा क्रमांक? कशाची वाहतूक करत असताना घटना घडली? कार चा नंबर अथवा इसमांचे वर्णन? सदरचे इसम खादीतील खाकीतील साहेबांची माणसे होती? इत्यादी परिपूर्ण माहिती न मिळाल्याने आरोपींनी तेच वाहन का लुटले? इतर कोणत्या वाहन चालकासोबत त्याच दिवशी तत्सम प्रकार घडला आहे काय? घडला असेल तर गुन्हा दाखल का झाला नाही? तसेच फिर्यादी दुध, फळभाज्या, जिवनावश्यक वस्तू कि जनावरे वाहतूक करत होता? ५० हजारांची मागणी करत मोबाईल फिर्यादी च्या हातातून हिसकावून घेत दहशत माजवून पासवर्ड घेतला तर फक्त १० हजार च का घेतले? गुन्हा दिनांक २७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला तर गुन्हा नोंद करण्यासाठी फिर्यादीने तब्बल ३४ तास का लावले? दरम्यान फिर्यादीचे वाहन आणि त्यातील कथीत माल कोणत्या ठिकाणी हलविण्यात आला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुसेसावळी : औंध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम कारवाईमुळे एका ट्रक चालकावर झालेल्या दरोडा व जबरदस्तीच्या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात एका आरोपीची ओळख पटवली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी सघन तपास सुरू ठेवला आहे.

        पोलिस प्रशासनाने दिलेल्या अपुऱ्या माहितीनुसार, फिर्यादी सलमान बालेखान बागवान (वय ४०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १२.२० या दरम्यान मौजे वडी (ता. खटाव) येथील उड्डाणपुला पलीकडे पुसेसावळी-औंध रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या हुंदाई कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी कार त्यांच्या ट्रकला आडवी मारली. त्यांनी फिर्यादीवर हाताने मारहाण केली, लाकडी दांडके व रॉडने जीवे मारण्याची धमकी दिली आणि मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. “आम्ही साहेबांची माणसे आहोत. रस्त्यावर चालायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगत त्यांनी पासवर्ड विचारून फिर्यादीच्या मोबाइलमधून १० हजार रुपये त्यांच्या फोनपे/गुगल पे खात्यावर जबरदस्तीने ट्रान्सफर केले.


               याबाबत औंध पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्री २१.५५ वाजता (स्टेशन डायरी एंट्री क्र. ०९) गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४), १२६(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ अविनाश सदाशिव साठे (सदर बाजार, सातारा) यांची ओळख पटली असून उर्वरित आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. तपासी अधिकारी एस. डी. जानकर (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

           परंतू या दाखल गुन्ह्या मधील फिर्यादी चे वाहनाचे प्रकार कोणते आणि त्याचा क्रमांक? कशाची वाहतूक करत असताना घटना घडली? कार चा नंबर अथवा इसमांचे वर्णन? सदरचे इसम खादीतील खाकीतील साहेबांची माणसे होती? इत्यादी परिपूर्ण माहिती न मिळाल्याने आरोपींनी तेच वाहन का लुटले? इतर कोणत्या वाहन चालकासोबत त्याच दिवशी तत्सम प्रकार घडला आहे काय? घडला असेल तर गुन्हा दाखल का झाला नाही? तसेच फिर्यादी दुध, फळभाज्या, जिवनावश्यक वस्तू कि जनावरे वाहतूक करत होता? ५० हजारांची मागणी करत मोबाईल फिर्यादी च्या हातातून हिसकावून घेत दहशत माजवून पासवर्ड घेतला तर फक्त १० हजार च का घेतले? गुन्हा दिनांक २७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला तर गुन्हा नोंद करण्यासाठी फिर्यादीने तब्बल ३४ तास का लावले? दरम्यान फिर्यादीचे वाहन आणि त्यातील कथीत माल कोणत्या ठिकाणी हलविण्यात आला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला