पाडळोशी परिसरात दुपारी दोन पासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा थयथयाट
वीजपुरवठा विस्कळीत :धायटी(चाफळ) नजीक वाहतूक झाली ठप्पSatara News Team
- Sat 11th May 2024 09:33 pm
- बातमी शेयर करा
चाफळ : चाफळ विभागातील पाडळोशी परिसरात शनिवारी दुपारी दोन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने परिसरातील काही गावांमध्ये नुकसान झाले आहे त्याचबरोबर विद्युत वितरण कंपनीचे खांब वाकल्याने काही ठिकाणी विद्युत वाहक तार तुटल्याने पुरवठा खंडित झाला आहे. धायटी नजीक वाहतूक विस्कळीत झाली आहे.
चाफळ विभागात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. पावसामुळे धायटी येथे नजीक बांधण्यात येत असलेल्या नवीन फरशी पुलाशेजारील शेतातून तयार केलेल्या रस्त्यात वरती मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली तसेच पाडळोशी डोंगरात असलेला विद्युत पोल पडला असून विद्युत वाहक तारा तुटून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. मात्र विद्युत कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वायर सोडून वाहतूक सुरळीत केली. चाफळ परिसरात असणाऱ्या पाडळोशी, मसुगडेवाडी धायटी,तावरेवाडी यासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नदी,नाले, ओढे, तुडुंब वाहू लागले. या पावसामुळे शेतातून काढलेला कडबा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
चाफळ परिसरात रस्त्यांची कामे धीम्या गतीने चालू आहेत. फरशी पूल बनवताना काही ठेकेदारांनी रस्ता पुलाच्या शेजारून रस्ता तयार करून वाहतूक सुरू केली आहे. मात्र वळीवाचा जोरदार पाऊस आल्याने या शेतातील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. तरी संबंधित ठेकेदारांनी जून पूर्वी रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 11th May 2024 09:33 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 11th May 2024 09:33 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 11th May 2024 09:33 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 11th May 2024 09:33 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 11th May 2024 09:33 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 11th May 2024 09:33 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 11th May 2024 09:33 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sat 11th May 2024 09:33 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 11th May 2024 09:33 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 11th May 2024 09:33 pm













