सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्काराणे सलग दहाव्यांदा औंध पोलिसस्टेशन जिल्हा पुरस्काराने सन्मानित
अशपाक बागवान - Sat 18th Mar 2023 02:55 pm
- बातमी शेयर करा
औंध : औंध पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याने सलग दहाव्या जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामुळे औंध पोलिस ठाण्याची मान उंचावली आहे. शुक्रवारी सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फेब्रुवारी महिन्यात चोराडे फाटा येथे झालेल्या लूटमार प्रकरणात चोरट्यांचा छडा लावून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला, तसेच केबल चोरी प्रकरणात नाकाबंदी करून आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला व या गुन्ह्यासह एकूण चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणले. यामध्येही सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत केला.
चोराडे फाटा येथे झालेल्या जबरी चोरीमध्ये आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने तपासात अनेक अडचणींचा सामना करीत सलग एक महिना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून सदरचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. त्याबद्दल सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी औंध पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलिस नाईक प्रशांत पाटील, किरण जाधव, महेश जाधव आदीसह कर्मचारी उपस्थित होते. या गौरवास्पद कामगिरीबद्दल औंध पोलिसांचे परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
औंध पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी धडपडत असतो. या भागातील क्राइम रेट कमी करण्यासाठी आमचा जिल्हा पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे. काम करीत असताना शाबासकीची थाप मिळाली की बळ मिळते.
सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडेऔंध.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 18th Mar 2023 02:55 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sat 18th Mar 2023 02:55 pm









