पाचगणीत मूलभूत सुविधा कोमात; मात्र अत्याधुनिक सुविधा जोमात
मूलभूत इ-टॅाईलेट बंद मात्र अत्याधुनिक इलेक्ट्रीक गाड्यांच चार्जीग स्टेशन सुरुSatara News Team
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
- बातमी शेयर करा
पाचगणी : सर्वसामान्य जनता व पर्यटकांच्या मुलभुत सुविधांना प्राधान्य न देता यात्रिंक युगातील गोष्टीना अव्वल स्थान देणाऱ्या पांचगणी नगरपालिकेच्या व्यथा अन कथा बाबत पांचगणी शहरात चर्चा रंगु लागल्या आहेत. पाचगणी शहरात २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इलेक्ट्रीक बाईक चार्जीग मशीन पॅाईटचे उद्घाटन पाचगणी नगरपालिकेकडुन करण्यात आले आहे.
पांचगणी शहराला लाखो पर्यटक भेट देत असताता. पर्यटकांच्या मुलभुत गरजांनकडे कानाडोळा करत २ कोटी ५० लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले इटॅाईलेट गत चार वर्षाहुन अधिककाळ देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे “माझी वसुधंरा “अभियाना अतर्गत यात्रीक युगातील नव्याने विद्युत उर्जेवर चालणाऱ्या गाड्याची व्यवस्थे करता चार्जींग स्टेशन पांचगणी नगरपालीकेकडुन सरु करण्यात आले आहे .
पांचगणी नगरपालीका स्वच्छतेत अव्वल असताना शहरातील शौचालयाची बिकट अवस्था , कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले इटॅाईलट मात्र बंद हा विरोधाभास सर्वसामान्य जनता व पर्यटकांची भ्रमिनिरास करणारा आहे . गत तीन वर्षापासुन पांचगणी नगरपालीकेवर प्रशासक लागु आहे . पांचगणीत प्रशासक म्हणुन आलेल्या अधिका-याच्या कारभारावर माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष कोणत्याही राजकीय नेत्याच लक्ष नाही . पांचगणी नगरपालीकेता कारभार दिवसे दिवस महमंद तुघलघी होत असल्याची चर्चा आहे .
पांचगणी नगरपालीका स्थानिक स्वराज्य संस्थेने नागरीकांच्या मुलभुत गरजांना समोर ठेवुन शहराच्या विकासाचे प्रकल्प हाती घ्यावे यात कुठलीच शंका नाही . मात्र नामाकंन मिळवण्यासाठी मुलभुत गरजांना बाजुला ठेवत . फक्त दिखावुपणासाठी उभारण्यात आलेले प्रकल्प हे कीती लोकाभिमुख आहे यांचा सारासार विचार पांचगणी नगरपालीकेच्या प्रशासकाने करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडुन होत आहे .
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 26th Jan 2025 03:44 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sun 26th Jan 2025 03:44 pm









