शिवकालीन वाघनख्यांचे आगमन हा सातारकरांसाठी ऐतिहासिक क्षण
येसूबाई फाउंडेशनच्या वतीने शिवाजी संग्रहालयाची पाहणीकोमल पवार
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासात छत्रपती शिवरायांनी वाघनखांच्या साह्याने प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला होता .त्या ऐतिहासिक वाघनखांचे साताऱ्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात साताऱ्यात आगमन होत आहे . हा ऐतिहासिक क्षण आहे या क्षणाचे सातारकरांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले आहे
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .संग्रहालयाच्या प्रदर्शनी दालनामध्ये विशेष बंदोबस्तात छत्रपती शिवरायांनी अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखे ठेवण्यात येणार आहे . या वाघनखाना लंडनच्या म्युझियम मधून जुलै महिन्यामध्ये एक वर्षासाठी महाराष्ट्रात आणण्यात येणार असून दहा महिन्यासाठी त्याचे वास्तव्य शिवाजी संग्रहालयात राहणार आहे . याकरता विशेष काचपेटीचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बंदिस्त राहणार आहे . तसेच या वाघनख्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे . या पूर्व तयारीची पाहणी शिवाजी संग्रहालयाचे अभि रक्षक प्रवीण शिंदे व येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केली . शिवाजी संग्रहालय नूतन दालने आणि ऐतिहासिक शिवकालीन साहित्यसह सुसज्ज होत असून लवकरच ते सातारकरांसाठी खुले होत आहे . शिवाजी संग्रहालयात वाघ नखांचे होणाऱ्या आगमन हा मोठा ऐतिहासिक क्षण असणार आहे या क्षणाची सातारकरांना साक्षीदार होण्याची इच्छा आहे
या संदर्भात बोलताना माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के म्हणाले , "साताऱ्याची भूमी ही ऐतिहासिक असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे . साताऱ्यात छत्रपतीं घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वास्तव्य आहे . छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची अनुभूती देणाऱ्या अनेक घटनांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा झालेला वध हा एक दैदिप्यमानं क्षण आहे अफजल खानाचा ज्या वाघनखांच्या साहाय्याने झाला ती वाघनखे पुढील दहा महिन्यासाठी शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे .हा अत्यंत ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षण आहे या क्षणाचे साक्षीदार सातारकरांनी निश्चित व्हावे आणि शिवाजी संग्रहालयाला भेट देऊन वाघनखांचे निश्चित दर्शन घ्यावे अशी अपेक्षा आणि आवाहन सुहास राजे शिर्के यांनी केले .येसूबाई फाउंडेशनच्या वतीने शिवाजी संग्रहालयाचे करोना काळात रखडलेले नूतनीकरण तसेच अद्ययावतीकरणाचे पुढील टप्पे याशिवाय संग्रहालयाच्या सुलभिकरणासाठी झालेले प्रयत्न यामध्ये राजेशिर्के यांनी मोलाचा वाटा उचलला होता . येसूबाई फाउंडेशनच्या वतीने या संग्रहालयाची पाहणी करून वाघनखांच्या पुढील नियोजनासाठी राजेशिर्के यांनी प्रवीण शिंदे यांना शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 18th Jun 2024 03:20 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 18th Jun 2024 03:20 pm











