जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेचे आमरण उपोषण सुरू
जीवन मोहिते
- Thu 13th Oct 2022 05:25 am
- बातमी शेयर करा
सातारा : हे गमेवाडी ता. कराड येथील सरपंच सविता रामचंद्र ढवळे व सदस्य यांना जातीवादी मानसिकतेतुन जाणीवपूर्वक पद रद्द करण्याकरीता राजकीय षडयंत्र रचणाऱ्या ग्रामसेवक प्रशांत सदाशिव कारंडे, उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव यांना निलंबित करुन कठोर कारवाई करावी. अशी मागणी करूनही अद्याप कार्यवाही झाली नाही.म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेतर्फे आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याची माहिती रमेश गायकवाड यांनी दिली. मागासवर्गीय प्रवर्गातून सरपंच म्हणुन सविता ढवळे व त्यांची आई सौ. बाळकाबाई ढवळे या गावातील एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत बिनविरोध निवडुण आल्या होत्या.गावात इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे एकच कुटुंब वास्तव्यास आहे. या गावातील आलेल्या इतर सदस्यांनी वय वर्षे ७५ असणाऱ्या सौ. बाळकाबाई ढवळे यांना सरपंच बनविण्याचा कुटील डाव आकला होता. परंतु त्यांचे वय पाहता त्यांची मुलगी सविता ढवळे यांना प्रशासनाने अनुमोदक आई तर सुचक स्वतः प्रशासन होऊन सरपंचपदी निवड करण्यात आली. याचाच मनात राग धरुन सर्व सदस्य उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव व ग्रामसेवक प्रशांत कारंडे यांनी जाणीवपूर्वक जातीय द्वेषातुन ओ.बी.सी. महिला सरपंच असल्याने जाणीवपूर्वक राजकीय डावपेच टाकून त्रास देण्याचे काम चालु केले आहे. यामध्ये सदर कारभार मनमानी करुन न झालेल्या कामाचे चेक पुर्ण झाले असल्याचे दाखवत गैरव्यवहार करीत आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांचे उल्लंघन करुन सरपंच सविता ढवळे यांच्या परस्पर बेकायदेशीर व्यवहार व कारभार चालवत आहेत. तसेच त्या कुटुंबीयांना मंजुर झालेले घरकुल काम चालु असताना अडथळे अणुन ते बंद पाडण्यात आले आहे.त्यांचे वडिल ९२hi वर्षाचे असल्याने रामचंद्र तुकाराम ढवळे यांना कारण नसताना खोटे नाट्य राजकीय हेतुने तक्रारी करुन कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यास भाग पाडले आहे. याचा जाब विचारता करुन जाती वाचक शिवीगाळ, दमदाटी, अंगावर येणे असे प्रकार सातत्याने ग्रामसेवक, उपसरपंच करत असुन हे मानवतेला काळिंबा फासणारे कृत्य चालु आहे. अश्या जातीवादी मानसिकतेत काम करणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंच यांना निलंबित करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.अशा आशयाची मागणी पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, खा. श्रीनिवास पाटील, उप मुख्यकार्यकारी अधिकारीधिरी (ग्रा.प.) आदींना प्रति देण्यात आलेल्या आहेत
#rpi
#rpisatara
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 13th Oct 2022 05:25 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 13th Oct 2022 05:25 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 13th Oct 2022 05:25 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 13th Oct 2022 05:25 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 13th Oct 2022 05:25 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 13th Oct 2022 05:25 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 13th Oct 2022 05:25 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 13th Oct 2022 05:25 am













