महिला कुस्तीगिरांच्या आंदोलनासंदर्भात पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Satara News Team
- Tue 30th May 2023 12:42 pm
- बातमी शेयर करा

सातारा : ऑलिम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीगिरांवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध सनदशीर मार्गाने जंतर- मंतरवर आंदोलन सुरू होते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉस्को (POCSO) कायद्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये संबंधित व्यक्तीला अजूनही अटक केली जात नाही, ही बाब गंभीर आहे. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहेत, हे लोकशाही राज्य आहे, अशी आपल्या भाषणातून प्रधानमंत्री ग्वाही देतात पण आपल्या शासनातील खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असतानाही अटक केली जात नाही. मात्र, याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिर महिला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे वागणूक देऊन अटक करण्यात आली. आरोपीला अटक करण्याऐवजी आंदोलनकारींना अटक करण्यात आली. अन्याय सहन कराव्या लागणाऱ्या तक्रारदार महिलांनाच अटक करण्यात आली, तेही लोकशाही देशातील सर्वोत्तम संस्था असणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनादिवशी ही घटना घडणे हे अत्यंत दुःखद, चीड आणणारे आहे. लोकशाही, समता, न्याय आणि बंधुता ही गोष्ट इमारतींमध्ये नसते, तर ती देशातील लोकांना IT येणे महत्त्वाचे आहे. एका बाजूला संसदेत लोकशाहीवर भाषण द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला बाधित,अन्यायग्रस्त महिलांचा न्याय करण्याऐवजी त्यांनाच हिंस्र आणि हीन वागणूक देऊन अटक करायची या कूटनीतीचा, फॅसिस्ट, हुकूमशाही वृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत आणि मागणी करीत आहोत की:
1. आरोपीना अटक करावी, जामीन मिळू देऊ नये आणि फास्टट्रॅक कोर्टामध्ये दाखल गुन्ह्याचे कामकाज त्वरित होऊन आरोपीला शिक्षा लागावी.
2. महिला कुस्तीगिरांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांची त्वरित सुटका करावी. अशी मागणी साताऱ्यातून करण्यात आली आहे यासंदर्भातली प्रत : (1) माननीय प्रधानमंत्री, भारत सरकार (2) माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य द्वारा: मा. जिल्हाधिकारी, सातारा कडे सादर
करण्यात आली आहे निवेदन देताना याप्रसंगी सांगण्यात आले adv. वर्षा देशपांडे मिनाज सय्यद विजय मांडके मालन कांबळे हे उपस्थित होते
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 30th May 2023 12:42 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Tue 30th May 2023 12:42 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Tue 30th May 2023 12:42 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Tue 30th May 2023 12:42 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 30th May 2023 12:42 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th May 2023 12:42 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th May 2023 12:42 pm