विद्यार्थी विद्यार्थिनींनी निर्भया पथकाकडे थेट तक्रार करा : उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे.
वाग्देव विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात निर्भया पथक क्र .३ ने केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.Satara News Team
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
- बातमी शेयर करा

वाठार स्टेशन : जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील निर्भया पथकाचे काम अगदी वाखाण्याजोगे आहे अशातच निर्भया पथक क्रमांक ३ हे प्रत्येक विद्यालयात जावून विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य असे मार्गदर्शन करताना दिसून येत आहे आज वाठार स्टेशन येथील वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात निर्भया पथकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोरेगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांचे विद्यार्थी विद्यार्थिनींना मोलाचे असे मार्गदर्शन झाले यावेळी निर्भया पथकाने सर्व विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचे टोल फ्री क्रमांक 112 व 1098 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले तसेच निर्भया पथक कोरेगाव विभाग यांचाही मोबाईल नंबर 7722014100 हा सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला यावेळी कोणतीही तक्रार असल्यास वरील टोल फ्री क्रमांक व दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केली जाईल असे आवाहन निर्भया पथक क्रमांक ३ च्या वतीने करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंत साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कोरेगाव तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य दिपक यादव सर यांनी केला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण जाधव सर यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद नोंदवला होता.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 20th Jan 2023 03:50 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 20th Jan 2023 03:50 pm