मांढरदेव मंदिर परिसरातील दुकान हटवण्यास स्थानिक व्यापारी व भाविकाचा तीव्र विरोध
Satara News Team
- Sat 10th Sep 2022 11:00 am
- बातमी शेयर करा
मांढरदेव : मांढरदेव देवस्थान ट्रस्टने देवस्थान परिसरातील दुकाने Mtdc प्रकल्पात स्थलांतर करणेबाबत नोटीस बजावली आहे. परंतू स्थानिक दुकानदार आणि भाविक यांचावतीने स्थलांतरला विरोध करण्यात येत आहे. त्याठिकाणहून दुकाने हटवल्यास ५००० लोकांच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम होईल. तसेच प्रकल्प मुख्य मंदीरापासुन १.५ ते २ किमी लांब आहे. स्थलांतर केल्यानंतर भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन होणार नाही. सदरील Mtdc प्रकल्प भौगोलिक दृष्ट्या चुकीच्या ठिकाणी बांधलेला आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या धोकादायक आहे. प्रकल्पाच्या ठिकाणची मृदा भुसभुशीत स्वरुपाची आहे आणि सद्यस्थितीत प्रकल्प एका बाजूने खचला आहे. त्याठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर निचरा होत असल्याने भविष्यात याठिकाणी दुर्घटनेना होऊ शकतात. मांढरदेव देवस्थानच्या नोटीसमध्ये २००४ साली झालेल्या दुर्घटनेला दुकानदारांना जबाबदार धरले आहे. परंतू राजन कोचर आयोगानुसार दुर्घटनेला पूर्णपणे मांढरदेव देवस्थान ट्रस्ट आणि वीज मंडळ जबाबदार आहे. या नोटीसमध्ये कोचर आयोगाच्या शिफारशींचा विपर्यास केला आहे. या स्थलांतराविरोधात ग्रामसभेने विशेष ठराव घेत स्थलांतराला विरोध केला असताना देखील पुन्हा नोटीसा मांढरदेव देवस्थान ट्रस्टने दुकानदारांना पाठवल्या आहेत. हि बाब ग्रामपंचायतीच्या हक्कांचे हनन करत आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्टने दुकानाचे स्थलांतर तात्काळ थांबवावे. अन्यथा मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक दुकानदार , ग्रामस्थ तसेच भाविकांनी दिला आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 10th Sep 2022 11:00 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 10th Sep 2022 11:00 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 10th Sep 2022 11:00 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 10th Sep 2022 11:00 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 10th Sep 2022 11:00 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 10th Sep 2022 11:00 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sat 10th Sep 2022 11:00 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sat 10th Sep 2022 11:00 am











