अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

सातारा दि. 19 (जि. मा .का) सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टी चा ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व दिनांक 02/08/2019 च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 20 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे संबंधितांना आदेशित केले आहे. सदर साध्या आदेश त्यांनी 19जुलै2023 रोजी दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला