शिवराज पेट्रोल पंप ते सातारा शहरातून लिंब खिंडीकडे जाणार्या जुन्या हायवेला अतिक्रमणास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वरदान
मोहन जगताप
- Sat 6th Aug 2022 11:15 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील पुणे मोळाच्याओढ्या एसटी बस स्थानकाच्या मार्गे कोल्हापूरकडे जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून लिंबखिंड ते शिवराज पेट्रोलपंप या अंदाजे दहा किलोमीटर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणावर शेकडो व्यावसायिक यांनी पत्र्याचे शेड उभारून व व्यवसायातील वृद्धि होण्याच्या ठिकाणी हजारो फलक उभारल्याने या मार्गावर विविध अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला असल्याने या ठिकाणाहून पादचारी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत लोक म्हणतात की शेकडोंच्या अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी मेहेरबान, तर मिळेल का मार्गक्रमण करणार्या पादचाऱ्यांना मोकळा स्वास घेण्याचे वरदान.याबाबत अधिक माहिती अशी की सातारा शहरातून जाणार्या या जुन्या पुणे कोल्हापूर हायवे रस्त्यावरुन साताऱ्यात वाहतुक कोंडीस कायमच सामना करावा लागत होता.लिंबखिंडीतून वाढेफाटा बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणांहून अनेक गाड्याची वाहतुक होत असल्याने सातारा शहरात येणार्या वाहनांची वाहतूक कमी झाली असली तरी या मार्गावरील रस्त्याच्याकडेला दोन्ही बाजूंनी फळ विक्रेते,चारचाकी व दुचाकी वाहनांची गॅरेज,चायनीज सेंटर, हॉटेल, ढाबे, व शेकडो मोठमोठे व्यापारी यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे अतिक्रमणांच्या विळख्यात घातले असून साताऱ्याच्या विद्रुपिकरणं करण्यास हे अतिक्रमण धारक जबाबदार असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ही जबाबदार असून त्यांनी अतिक्रमणे झालेल्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रितसरपणे नोटीसा देऊनही कारवाई करण्यासाठी अधिकारी व संबधित यंत्रणा टाळाटाळ करीत असून अतिक्रमण झालेल्या ठिकाणी जादा अतिक्रमणे करून उलट अधिकाऱ्यांच्या हित जोपासण्यासाठी हे प्रकार होत असल्याने या ठिकाणच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यास हे अधिकारी जबाबदारी झटकण्याचे प्रकार करतात.या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सर्व संबंधित अतिक्रमण विरोधी यंत्रणा यांनी सर्वसामान्य प्रवाशी व पादचारी मोकळा स्वास घेण्यासाठी सहकार्य करण्याची चर्चा जनमानसात होत आहे....
जुन्या मोडकळीस आलेल्या गाड्या या रस्त्यालगत लावण्यात आल्या असून त्या गाड्याही अतिक्रमण विभागाने रितसर बाजूला करून वाहतुकीस अडथळा येणार्या अनेक वृक्ष व त्या वृक्षाच्या फांद्या, वळणावळणाच्या झुडपे काढण्याची विनंती करून साताऱ्यात या मार्गे येणार्या सर्वच प्रवाशांना दिलासा द्यावा सुधाकर यादव माजी उपसरपंच,शाहूपुरी ग्रामपंचायत
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 6th Aug 2022 11:15 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 6th Aug 2022 11:15 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 6th Aug 2022 11:15 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 6th Aug 2022 11:15 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 6th Aug 2022 11:15 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 6th Aug 2022 11:15 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 6th Aug 2022 11:15 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 6th Aug 2022 11:15 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 6th Aug 2022 11:15 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 6th Aug 2022 11:15 am









