सातारा- जावलीतील ग्रामपंचातीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व

सातारा :  सातारा व जावली तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने बाजी मारली. सर्वच ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विचाराचे उमेदवार निवडून आले असून सातारा- जावली मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने वर्चस्व मिळवले आहे.

जावली तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या सर्वच ग्रामपंचायती आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या विचाराच्या आहेत. दरम्यान उर्वरित कुरळोशी, वाघदरे, भामघर (सरपंच), सांगवी (सदस्य-१), बिभवी, आनेवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. या सर्वच ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली.

सातारा विधानसभा मतदारसंघातील सातारा तालुक्यातील पोटनिवडणूक लागलेल्या कोंडवे (सदस्य - १), पांगारे (सदस्य-१), कोंढवली (सदस्य- १) येथे आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या उमेदवारांची निवड झाली. सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या धावडशी, कारी, लुमानेखोल, नित्रळ, वडगांव, अंबवडे आदी ग्रामपंचायतींवरही आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने सत्ता मिळवली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला