जेष्ठ महिलेच्या पिशवीमधुन रोख रक्कम ५० हजार रुपये चोरी करणा-या चोरट्यास वाई तपासपथकाने २४ तासात रोख रक्कम ५० हजार रुपयांसह घेतले ताब्यात

  वाई   :  वाई जेष्ठ महिला नामे मंदा अशोक खंडागळे रा गणपती आळी वाई या दिनांक २८/०६/२०२४ रोजी त्यांचे पतीचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी साठवलेले ५० हजार रुपये घेऊन केळकर हॉस्पीटल चावडी चौक येथे जात असतांना अज्ञात चोरटयाने महिलेची कापडी पिशवी खालुन कशानेतरी कापुन अज्ञात चोरट्याने ५० हजार रोख रक्कम रुपये चोरुन नेहलेबाबत वाई पोलीस ठाणेस माहिती प्राप्त झाल्याने वाई पोलीस ठाणे येथे सदरबाबत भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर अज्ञात चोरट्याचा शोध घेत असतांना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्याच्या खास गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, चावडी चौक येथे जेष्ठ महिलेची चोरी करणार संशयित इसम हा छत्रपती शिवाजी चौक वाई येथे येणार आहे. अशी बातमी प्राप्त होताच वाई पोलीस ठाणेकडील तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांना सदरच्या संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्यानंतर तपासपथकाने छत्रपती शिवाजी चौक वाई येथे सापळा रचुन संशयित इसमास ताब्यात घेऊनत्यास त्याचे नाव विचारले असता बिलाल बरसेअली जाफरी रा कल्याण ठाणे असे सांगितले त्यास चौकशीकामी पोलीस ठाण्यास आणुन त्याची कसुन चौकशी केली असता, त्याने दिनांक २८/०६/२०२४ रोजी चावडी चौक येथे झालेल्या चोरीची कबुली दिल्याने, त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे खिशात रोख रक्कम ५० हजार रुपये मिळुन आले. ते गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेले आहेत सदरच्या वाई पोलीस ठाण्याच्या कारवाई बाबत जनसामान्यातुन पोलीस प्रशासनाविषयी उल्लेखनीय कामगिरीबाबत भावना व्यक्त होत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा अजित जाधव, पो. कॉ राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत, शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला