स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव: मुख्याध्यापक सभा संपन्न..

महाबळेश्वर : आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी  शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वरच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संजीवन विद्यालय, पाचगणी येथे संपन्न झाली. सदर जाणीव जागृतीच्या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी मा. गटविकास अधिकारी श्री. अरुण मरभळ, मा.गटशिक्षणाधिकारी श्री. आनंद पळसे उपस्थित होते. मा.मरभळ यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वराज्य महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा आदी उपक्रमाअंतर्गत शालेय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात वैविध्यपूर्णरीतीने करावे. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या सेवा कालखंडात मिळालेली एक सुवर्णसंधी असून या महोत्सवास आपले योगदान द्यावे, त्याचबरोबर जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर, विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती, शालेय परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, परसबाग तयार करणे इत्यादी विषयी संदेश दिले. या कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक शाळेस शेवगा,कढीपत्ता, कोकम, फणस,झाडबिया इत्यादी चे प्रातिनिधिक स्वरूपात मा. गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

             मा. गटशिक्षणाधिकारी श्री.आनंद पळसे यांनी आपल्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा उपक्रम दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या सर्व शालेय उपक्रमांची सखोल माहिती, ध्वज संहिता पालन विविध स्पर्धांचे आयोजन, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे विषयी व इतर प्रशासकीय विषय उद्बोधन केले. हर घर तिरंगा विषयी शासन निर्णय व निर्गमित सूचना संदर्भात प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीम. श्रीनिधी जोशी यांनी केले. वृक्षारोपण संदर्भात श्री. कुलदीप अहिवळे, शालेय पोषण व ऑडिट याबाबत श्री. सचिन जायकर यांनी मार्गदर्शन केले. श्री. प्रकाश भिलारे यांनी आभार मानले. या सहसभेस केंद्रप्रमुख श्री. दीपक चिकणे, श्री. दिलीप जाधव व श्री. प्रकाश भिलारे तसेच तालुका शिक्षक संघटना अध्यक्ष श्री. सुरेंद्र भिलारे व श्री. भाऊसाहेब दानवले, माध्यमिक मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष श्री. प्रकाश बेलोशे व संजीवन विद्यालय प्राथमिक विभाग प्राचार्य आकांक्षा बोंगाळे व सर्व माध्यमांच्या शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या सहसभेच्या यशस्वीतेसाठी श्री. भास्कर कोळी, श्री. सचिन चव्हाण, श्रीम. पुनम घुगे यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला