देशी गाईचं डोहाळ जेवण घालून अनोखा संदेश

A unique message with local cow dhow food

सातारा : आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही गाईवर करतो. याचं उत्तम उदाहरण साताऱ्यातील वाढे गावात पाहायला मिळाले. या गावातील हेमंत नलावडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाने आपली खिलार जातीची लाडकी गाई 'माऊली' हिचे डोहाळ जेवण घालून एक अनोखा संदेश दिला आहे.गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे देशी गाईचे दूध लहान मुलांसाठी अमृतासमान असते. तसंच देशी गाईचे गोमूत्र, शेणाचा सुद्धा वापर औषधी समजला जातो. त्यामुळे या गाईचे महत्व समजलेल्या हेमंत नलावडे यांची माऊली ही गाई त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली आहे. यामुळे गाईचे डोहाळ जेवण करण्याचा या परिवाराने निर्णय घेतला.शेतकऱ्यांना देशी गाईचे महत्व समजावे, हा उद्देश नलावडे परिवाराचा आहे. या अनोख्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाले होते. माऊली या गाईची साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली. मग गोडधोड खायला घालून तिला ओवाळण्यात आले. या कार्यक्रमाला नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेदरम्यान, नलावडे कुटुंबाने शेतकऱ्यांना देशी गाईचं महत्व समजावे, यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.गाईचे महत्व समजलेल्या हेमंत नलावडे यांची माऊली ही गाई त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली आहे. याच गाईचं त्यांनी डोहाळ जेवण घातलं आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला