निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदार राहुल चव्हाणचे लायसन्स रद्द करावे : इम्रान मुल्ला यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सातारा : निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कराड नगरपालिकेचा ठेकेदार राहुल चव्हाण याच्या बोगस कामांची चौकशी करून त्याचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी सुरक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
  या निवेदनात म्हटले आहे कि, कामे प्रलंबित (पूर्ण नाही) व निष्कृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करा लायसन्स रद्द करावे नगरपरिषदेचे ठेकेदार श्री. राहुल चव्हाण, राजलक्ष्मी एन्टरप्रायझेस यांनी कराड नगरपरिषदेतील कामे बोगस करुन काम पूर्ण नसताना बिले अदा करुन घेतली आहेत व प्रशासनाची दिशाभूल केली आहे. तसेच राजलक्ष्मी एन्टरप्रायझेसला सदर कामे घेता येतात का याची तपासणी करावी. कराड नगरपरिषदेचे स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये देशात प्रथम क्रमांक येणारे शहर म्हणून नांव लौकिक आहे. नगरपरिषदेचे घनकचरा व्यवस्थापनाची घंटागाडी पार्किंग रोडचे काम, जून २०२० रोजी घेतलेले आहे. सदरचे काम आज अखेर पूर्ण केलेले नाही. सदर कामाची रिस्क अॅण्ड ऑन कॉस्ट वरती सदरचे काम काढून घेऊन नगरपरिषदेच्या मालकीच्या वाहनासाठी आवश्यक असणारी पार्किंगचे शेड लवकर पूर्ण करुन घ्यावी, तसेच मागील दोन वर्षात राजलक्ष्मी एन्टरप्रायझेस यांनी केलेल्या नगरपरिषदेच्या रस्त्यांच्या कामाचे जिल्हा प्रशासन अधिकान्यांच्या अधिपत्त्याखाली क्वॉलिटी कन्ट्रोल कमिटी स्थापन करुन सर्व कामांच्या दर्जा व गुणवत्ता तपासून घ्यावी. सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन पैशाचा अपहार करण्यात आलेला आहे. सदर राजलक्ष्मी एन्टरप्रायझेसला मदत करणारे कराड नगरपालिकेचे, बांधकाम विभागाचे, अकाऊंट विभागाचे, आरोग्य विभागाचे व त्यांच्या कामाच्या संबंधीत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. सदर कामाची त्वरीत चौकशी करुन राजलक्ष्मी एन्टरप्रायझेसचे लायसन्स रद्द करण्यात यावे. ही नम्र विनंती. अन्यथा मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा याठिकाणी बेमुदत प्राणांतिक उपोषण करावे लागेल, याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय सुरक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला, कराड तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड  माध्यमांशी बोलताना सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला