औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे पीएम स्किल रन उत्साहात संपन्न...
प्रसाद भोसले
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
- बातमी शेयर करा

सातारा : विश्वकर्मा जयंती निमित्त आज देशभरातील आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम स्किल रन आणि दिक्षांत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते... दोन्ही कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसाद आणि उत्साहात पार पडले.
सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घाडगे साहेब, शाहूपुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक फडतरे साहेब आणि संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर साहेब यांनी स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. पाच किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे अकराशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता. यात मुलींमध्ये मिताली बोराटे, किरण गुरव आणि शिवानी बडेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलांमध्ये सुरज साळुंखे, अजिंक्य सपकाळ आणि आदित्य चव्हाण यांनी बाजी मारली. विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली... या स्पर्धेसाठी गट निदेशक सर्वश्री धनंजय हेंद्रे, बोराटे सर, रियाझ शेख, साबळे सर, भिंगारदेवे सर, गोसावी सर, उद्धव इंगवले, चिंतामणी काटवटे, पांडुरंग बगाडे, श्रीधर पवार, विजयकुमार शिंदे, प्रशांत हातागळे, प्रदिप शिंदे, संभाजी मिस्त्री, जगन्नाथ देटके, दिपक चव्हाण तसेच महिलांची रन यशस्वी करण्यासाठी वैशाली इंगवले, रूपाली निकम, अमृता भालेराव आणि कामिनी हिरवे मॅडम यांचे सहकार्य लाभले...
त्यानंतर लगेचच कौशल्य विकास विभागातील राष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संस्थेच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर यांनी केले. संस्था जिल्ह्यातील आणि देशातील कौशल्य विकास क्षेत्रात नावारूपास येत असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विजय धायगुडे साहेब आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी देशमाने साहेब उपस्थित होते. दोघांनीही आपल्या मनोगतात सर्व पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक व्यवसाय निहाय गुणवत्ताप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे नोकरीसाठी जापान येथे निवड झालेला हर्ष बांबरस आणि अमिन आत्तार यांनाही सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार शिंदे आणि शशिकांत सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पाटोळे यांनी केले.
संस्थेतील सर्व गटनिदेशक, निदेशक,कार्यालयीन कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यास मौलिक योगदान लाभले.
#PMSkillRun
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Sun 17th Sep 2023 07:48 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Sun 17th Sep 2023 07:48 pm