कास पठारावरील हाॅटेल बांधकाम अधिकृत करण्याची स्थानिकांची मागणी
Satara News Team
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
- बातमी शेयर करा
सातारा : कास पठार आणि परिसरातील स्थानिक भूमिपुत्र नागरिकांनी उभारण्यात आलेली हॉटेल ही अधिकृत करण्याची मागणीसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सातारा तहसीलदार यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बांधकामांना नोटीस देऊन कारवाई करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या विरोधात आज स्थानिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.कास येथील स्थानिक रहिवाशी रामचंद्र उंबरकर म्हणाले, प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या सूचना स्थानिक व्यवसायिकांना दिल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. येथील स्थानिक नागरिक, व्यावसायिक भीतीच्या छायेखाली आहे. स्थानिक नागरिकांनी आपल्या मालकीच्या जागेत हॉटेल व्यवसाय उभारले आहेत. त्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे, तर काही मोठ्या उद्योजकांनी गुंतवणूक करून हॉटेल व्यवसाय उभे केले आहेत. त्यातून स्थानिक युवकांना आणि महिला, पुरुषांना रोजगार संधी मिळत आहे.भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष रामदास कार्वे म्हणाले, या बांधकामापासून पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, असे कृत्य आम्ही करणार नाही. प्रशासनाने योग्य नियमावली तयार करून काही बंधनकारक नियम लागू करून कायदेशीररित्या या ठिकाणी असलेले हॉटेल व्यवसाय अधिकृत करावेत, अशी मागणी स्थानिक व्यवसायाकांनी निवेदनाद्वारे केली आहे
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 25th Aug 2022 12:31 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 25th Aug 2022 12:31 pm









