पालिका कर्मचार्यांची दिवाळी गोड 40 हजारांचे अनुदान खात्यावर
प्रकाश शिंदे - Sat 22nd Oct 2022 04:12 pm
- बातमी शेयर करा
सातारा ; सातारा नगरपालिकेतील कर्मचारी तसेच अधिकार्यांना अॅडव्हान्स, सानुग्रह अनुदान, महागाई फरक याची संवर्गानुसार 35 ते 40 हजारांची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून ही ‘दिवाळी भेट’ असल्याची भावना कर्मचारी, अधिकार्यांमध्ये आहे. पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम मिळाल्याने यावेळी कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे.
सातारा नगरपालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी दरवर्षी केली जाते. नगरपालिकेत सर्वमिळून सुमारे 462 अधिकारी तसेच कर्मचारी आहेत. कर्मचारी तसेच अधिकार्यांच्या
मागणीचा विचार करुन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी संवर्गानुसार सुमारे 12 हजार 500 अॅडव्हान्स, सुमारे 17 हजार सानुग्रह अनुदान, सुमारे 8 ते 9 हजार महागाई भत्ता फरक असे सुमारे 37 हजार ते 40 हजार रुपये एका कर्मचार्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल आरती नांगरे यांनी ही कार्यवाही केली आहे. कर्मचार्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनोखी भेट मिळाली. त्यांची यावर्षीची दिवाळी आणखी गोड होणार आहे. कर्मचार्यांना देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या रक्कमांमुळे नगरपालिकेवर लाखो रुपयांचा बोजा पडला आहे.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची तत्परता
दिवाळीसाठी बोनस मिळावा यासाठी नगरपालिका कर्मचार्यांना संघर्ष करावा लागला आहे. निवेदने देवून, आंदोलने करुन 10 हजार ते 15 हजारापर्यंतच सानुग्रह अनुदान दिले जायचे. त्यासाठी पदाधिकार्यांच्या नाकदुर्या काढाव्या लागल्या होत्या. मुदत संपल्यामुळे यावर्षी प्रशासक नियुक्त झाले. त्यामुळे यावर्षी संघर्ष न करता कर्मचारी, अधिकार्यांना घसघशीत बोनस मिळाला. कर्मचार्यांच्या दिवाळीपूर्वी अडचणी लक्षात घेवून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्परता दाखवल्याने समाधान व्यक्त होत आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sat 22nd Oct 2022 04:12 pm









