शहीद तुकाराम ओंबळे यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार -- एकनाथ ओंबळे

पाचगणी :  मुंबई 26 /11 घटना संपूर्ण जगात कायदा सुव्यवस्थेला हरवणारी होती यातच पाकिस्तान वरून देशावर हल्ला करण्यासाठी आलेला अजमल कसाब याला जिवंत पकडलेले जावळी तालुक्याचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक जावळी तालुक्यात होणार असल्याचे खात्रीलायक संकेत मिळाले आहेत येत्या 26 11 2022 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती त्यांचे बंधू शिंदे सरकार गटाचे जावळी तालुक्याचे नेते एकनाथ ओंबळे यांनी दिली आहे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रेखांकन अहवाल सादर केल्यानंतर मंत्रालयीन सूचने चा माहितीनुसार येत्या 26 नोव्हेंबरला जिल्हयाचे पालकमंत्री शहिद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी येऊन स्मारकाचे भूमिपूजन करणार असल्याचेही एकनाथ ओंबळे एका प्रसिद्ध पत्रकार नमूद करून माहिती दिली आहे 
26/ 11 ची घटना होऊन 14 वर्षे झाली आता 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर जावळी तालुक्यात जावळीचा वाघ म्हणून झडप घेऊन अजमल कसाब या अतिरेक्याला
 पकडणारे तुकाराम ओंबळे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यस्मारक होणार असेही  ओंबळे म्हणाले

 राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री मा. शंभुराज देसाई यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली व त्यांना या संदर्भातले निवेदन ही स्मरण पत्र म्हणून सादर केल्यानंतर व या भेटीत शाहिद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी तात्काळ संबंधित अधिका-यांना आठ दिवसाच्या  आराखडा सादर करण्याचे आदेश देऊन येत्या २६ नोव्हेंबर रोजी मी स्वतः येऊन भुमिपुजन करणार आहे असे आश्वासन दिले.
 दिड दोन महिन्यापुर्वीच मुख्यमंत्र्यांना स्मारकासंदर्भात निवेदन दिलेले व मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार मा प्रांत व तहसिलदार यांच्या उपस्थितीन चार बैठका झाल्या व आराखड्याचे नाम अंतिम टप्यात आले आहे. शहिद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक अतिशय भव्य व देखणे झाले पाहिजे अशा सुचना अधिकायांना देऊन स्मारकासाठी हवा तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला