जावळी तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरू असणारे अवैद्य दारू धंदे बंद करा अन्यथा कायदा हातात घेऊन दारूचे अड्डे उध्वस्त करू -सौरभ शिंदे
Satara News Team
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
- बातमी शेयर करा

जावळी : वर्षानुवर्ष जावळी तालुक्यामध्ये सुरू असणारे गल्लीबोळातील गावागावातील अवैध दारूचे गुप्ते धंदे तात्काळ पोलिसांनी बंद करावे तालुक्यातल्या व जिल्ह्यातल्या संबंधित उत्पादन शुल्क विभाग एलसीबी त्याचबरोबर पोलीस यंत्रणेच्या वरद हस्ताने सुरू असणाऱ्या या धंद्यांवर कठोर कारवाई होणार नसेल तर पर्यायी कायदा हातात घेऊन हे संबंधित दारूचे अड्डे उध्वस्त आम्ही करू असा इशारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिला आहे एका प्रसिद्धी पत्रकात सौरभ शिंदे म्हणाले
गेले काही महिन्यापूर्वी आम्ही तालुक्यातील मान्यवरांनी मिळून जावली तालुक्यातील अवैद्य दारु धंदे बंद व्हावेत व शासनमान्यता प्राप्त दारु विक्रीचे व्यवसाय चालू व्हावेत यासाठी उठाव केला होता. हेतू स्वच्छ आणि स्पष्ट होता. त्यावेळेस सर्वांचे म्हणणे हेच होते की, अवैद्य दारु धंदे हे कधीच बंद होऊ शकत नाहीत व परिणामी शासनाचा बुडत असलेला महसुल नकली दारू, वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती, दारु सम्राट यांची मस्ती, हप्तेबाजी याला आळा बसणे अशक्य आहे. त्यावेळी अनेक मान्यवरांनी, काही संस्थांनी व तथाकथित समाजसेवकांनी आम्हाला विरोध केला व दारू सारख्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहोत असा कांगावा केला. परंतू आजही तीच विदारक परिस्थिती जावलीमध्ये सर्वत्र दिसत आहे. सर्व अवैद्य दारू धंदे राजरोसपणे जावली तालुक्यात विभागवार चालू असलेले दिसून येत आहेत. कोणतेही गाव किंवा भाग याला अपवाद नाही. अगदी गावातील शेंबड पोरगं पण सांगेल की अवैद्य दारू धंदे कुठे चालू आहेत परंतू पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग ज्यांना गुन्हेगारी तपासणीचे शिक्षण दिले गेलेले असते त्यांना मात्र एकही धंदा हा दिवसाढवळ्याही चालू असलेला दिसत नाही ही शोकांतिका आहे.
उत्पादन शुल्क अधिकारी, एलसीबी चे काही अधिकारी मात्र जावली तालुक्यामध्ये तारखेला नियमितपणे येत असल्याच्या चर्चा देखील जावळी तालुक्यात प्रत्येक चौकात होऊ लागले आहेत .त्यांच्या पाठबळाशिवाय हे धंदे जावलीमध्ये चालू शकत नाहीत हे त्रिकालबादी सत्य कुणीही नाकारु शकत नाही. किंबहुना आम्ही केलेल्या शासन मान्यताप्राप्त दारू दुकाने चालू झाली पाहिजेत याच्या विरोधात ज्या तथाकथित समाजसेवकांनी कारस्थान रचले त्यांना ही अवैद्य दारु धंदे करणा-या गुन्हेगारांनी वेळोवेळी रसद पुरविली व हा निर्णय हाणून पाडण्यासाठी लागेल ते चलन व यंत्रणा पुरविली असं आम्हाला वाटतं. कारण जर शासन मान्यताप्राप्त दारू दुकान चालू झाले .तर हो अवैद्य धंदे पुर्णपणे बंद पडतील व त्यातून मिळणारी काळी माया, हप्तेबाजी बंद होईल या लालसेपोटी हे सर्व केले अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र आहे.
आज राजरोसपणे अवैद्य दारु धंदयाचे पूर जावलीमधील प्रत्येक विभागात ओसंडून वाहत आहे .याला सर्वस्वी जबाबदार हे उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन व एल सी बी विभाग आहे. उत्पादन शुल्क अधिकारी, एलसीबी चे अधिकारी मात्र जावली तालुक्यामध्ये तारखेला नियमितपणे येत असल्याच्या चर्चा देखील जावळी तालुक्यात प्रत्येक चौकात होऊ लागले पोलीसांबरोबरच समाजसेवकाचा बुरखा पांगारलेले यांची हप्ते गोळा करणारी टोळी ही तयार झालेली आहे. ज्यामध्ये सर्व प्रशासन सामील आहे. पोलीस प्रशासनाने मनावर घेतले तर एकही अवैद्य धंदा हा तालुक्यात चालू राहणार नाही हे मात्र नक्की. कुडाळ करहर म्हसवे सायगांव मेढा , सोमर्डी, सरताळे,केळघर या सर्व विभागात आपले साम्राज्य समजणारे व जहागिरी वाटून घेतल्यासारखे हे सर्व अवैद्य धंदेवाल्यांची पाळेमुळे पसरली आहेत. तरी काहींनी ठिकठिकाणी शाखा काढल्या आहेत. म्हणून आम्ही सांगत होतो की अवैद्य दारु धंदयांना आळा घालण्यासाठी शासन मान्य दारू दुकाने ही जावली तालुक्यात चालू झाली पाहिजेत परंतू वास्तविक पोलीस प्रशासनालाही प्रत्यक्षात ही अवेद्य दारु धंदे चालू राहिली पाहिजेत असे दिसतंय त्याशिवाय त्यांनाही यातला मलिदा मिळणार नाही.
तालुक्यातील दारु बंद व्हावी म्हणून त्यात्यावेळी आम्हीही आग्रहक्काने पुढाकार घेतला होता पण दारु बंदीचा सफल हेतू झाला असे आम्हाला वाटत नाही तर हप्तेबाजीला रान मोकळे झाले आणि समाजसेवकांनी त्यांचं भांडवल करत पुरस्कार मिळवले असंच म्हणावं लागेल. इथून पुढेही आम्ही शासनमान्य दारु दुकाने चालू होतील व ही अवैद्य दारु धंदे करणा-यांना आळा बसेल यासाठी प्रयत्नशील राहू व लवकरच साता-याचे एसपी समीर शेख यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाचा चाललेला गैरकारभार यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे भानुदास गायकवाड नितीन दूधस्कर रामचंद्र फरांदे संदीप परामने रवींद्र परामने पांडुरंग जवळ केली आहे
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 7th Oct 2024 06:52 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 7th Oct 2024 06:52 pm