कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी विधायक उपक्रमांची रेलचेलSatara News Team
- Sat 20th May 2023 10:25 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस शुक्रवार 26 'मे' रोजी साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध समोजपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भाजपा नेते तथा खटाव- माण साखर कारखान्याचे को- चेअरमन मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त
सोमवारी दि.22 रोजी नागठाणे येथे भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर एच.व्ही. देसाई आय हाॅस्पिटल हडपसर पुणे आणि मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर चौक नागठाणे येथे सकाळी नऊ वाजता अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड.विक्रम पवार तर प्रमुख अतिथी बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी दि.23 रोजी मसूर येथे सकाळी नऊ वाजता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दि.24 रोजी रहिमतपूर येथे सकाळी नऊ वाजता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवारी सायंकाळी सहा वाजता मत्यापूर येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे दमदार नेतृत्व मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला- भगिनींसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम खेळ पैठणीचा, खेळ मनोरंजनाचा....! आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर चे अध्यक्ष सौ. चित्रलेखाताई माने- कदम, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता शिंदे तसेच बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगलताई घोरपडे व सौ. विजया गुरव या उपस्थित राहणार आहेत. होम मिनिस्टर प्रस्तुत दीपक साबळे या कार्यक्रमाचे नेटके संयोजन करणार आहेत. या कार्यक्रमास सर्व महिला भगिनींनी उपस्थित रहावे असे आव्हान संयोजक सौ. समता घोरपडे सौ. तेजस्विनी घोरपडे सौ. रिना घोरपडे व आयोजक मनोजदादा घोरपडे युवा मंच महिला आघाडी कराड उत्तर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद व भार्गवी चिरमुले उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. किवळ ता. कराड येथे दि.25 रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिनी
दि. 26 रोजी सकाळी नऊ वाजता पाली गावचे आराध्य श्री. खंडोबा देवाचा अभिषेक व बांधकाम कामगार आरोग्य शिबिर आयोजक योगेश्वर सामाजिक संस्था पाल व पाल ग्रामस्थांच्यावतीने आरोग्य शिबिराचे सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी विधायक उपक्रम कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार असल्याचे अमोल पवार यांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 20th May 2023 10:25 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 20th May 2023 10:25 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 20th May 2023 10:25 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 20th May 2023 10:25 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 20th May 2023 10:25 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 20th May 2023 10:25 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 20th May 2023 10:25 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 20th May 2023 10:25 pm













