देशी खिलार गाय वाचली पाहीजे.
Satara News Team शरद कदम
- Mon 11th Jul 2022 05:12 am
- बातमी शेयर करा
सध्या बैलगाडा शर्यत सुरू झालेमुळे पुन्हा देशी गोवंश वाढू लागला असला तरी देशी खिलार गाय वाचली पाहीजे. काही जागृत संघटना यांच्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईचे जीव वाचले आहेत. आषाढ महिन्यात बेंदूर सण साजरा करताना गाईची आणि बैलांची पूजा करून सवाद्य मिरवणूक काढणारा बळीराजा आजचा बेंदूर सण आनंदाने साजरा करत आहे.
वडूज : महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा होत असताना बळीराज्याचं राज्य आता संपुष्टात आले आहे. देशी गोवंश नामशेष होत चालला असून त्यांच्या जागी विदेशी संकरित गाईनी अतिक्रमण केले आहे. देशी खिलार गाईपेक्षा शेतकरी संकरीत गाईलाच जास्त महत्व देऊ लागला आहे. देशी गाईपासून शेतकऱ्यांना अनेक फायदे आहेत ते संकरीत गाईपासून मिळत नाहीत. त्यामुळे देशी खिलार गाय कत्तलखान्यापासून वाचली पाहिजे. देशी गाई पासून पंचगव्य तयार करताना देशी गाईचे दूध, तूप, ताक, दही, गोमूत्र आणि शेण याचा वापर करतात. आयुर्वेदात देशी गाईला फार महत्त्व आहे. ज्या ठिकाणी देशी गाईची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतोच शिवाय वातावरण ही प्रसन्न राहते. देशीगाईच्या शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा परिसरात सुलभ वातावरण बनवते. देशी गाईच्या पाठीवर असणारी सूर्यनाडी ही तिच्या वशिंदात सूर्यकिरण शोषून घेऊन त्या सुर्यनाडीच्या माध्यमातून त्वचा, दूध, गोमूत्र आणि शेण यांच्यात रूपांतरित केली जाते. देशी गाईचे गोमूत्र प्राशन केल्याने अनेक विकार बरे होतात म्हणून पंचगव्यला महत्व प्राप्त झाले आहे. देशी गाईला चालता फिरता दवाखाना म्हणतात त्यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबात एक देशी गाय असणे गरजेचे आहे. गाईच्या पाठीवरून मानेपासून शेपटापर्यंत हात फिरवत राहिल्यास साधारण वीस मिनिटात रक्तदाब साधारण होऊ शकतो. देशी गाईच्या कपाळावर असणारा उंचवटा ह तिच्या मेंदूचा रिमोट कंट्रोल मानला जातो. साधारण जनावरांच्या प्रजातीमध्ये खिलार गाय हुशार आणि चपळ मानली जाते. देशी गाईच्या दुधामुळे बालके हुशार आणि चपळ होतात. देशी गाईच्या दह्यात आम्लांश प्रमाण मापात असल्यामुळे शरीरातील आमलपित्त कमी होण्यास मदत होते. दुधात कमी स्निग्धता आणि ग्लुकोज फ्राक्टोजचे प्रमाण नियमित असल्यामुळे दूध शीत उष्णतेवर तापवून त्याची साई भाजलेल्या ठिकाणी लावल्यास भाजलेल्या जागेवर पांढरे व्रण उठत नाहीत. तुपाच्या वापरामुळे मूळव्याध आणि त्यास निगडित आजार कायमचे बरे होतात. जर गोमूत्राचा फवारा घरात आणि परिसरात दिल्यास उपद्रवी सूक्ष्मजीव नाहीसे होतात. सेंद्रिय शेतीचा गोमूत्र शेण दही ताक याचा वापर करून स्लरी तयार करून त्याचा भाजीपाला पिकावर फवारणी दिल्यास दर्जेदार उत्पन्न मिळण्यास मदतच होते. अस्थिव्यंग किंवा मणक्याच्या त्रास यावर गाईच्या तुपात कापूर मिसळून हलके मालिश केल्यास ते हाडापर्यंत शोषले जाऊन आराम मिळतो. मानसिक विषमता रुग्ण देशी गाई कडे काही वेळ एकाग्र पाहत राहिल्यास मानसिक संतुलनासाठी हा उपाय खात्रीशीर आहे. गाईचे शेण कितीही दिवस एका जागेवर राहिले तरी त्यात किडे होत नाहीत. सेंद्रिय शेतीला गाईच्या शेण खतामुळे उच्च प्रतीची उत्पादने मिळण्यास मदत होते.
सध्या बैलगाडा शर्यत सुरू झालेमुळे पुन्हा देशी गोवंश वाढू लागला असला तरी देशी खिलार गाय वाचली पाहीजे. काही जागृत संघटना यांच्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईचे जीव वाचले आहेत. आषाढ महिन्यात बेंदूर सण साजरा करताना गाईची आणि बैलांची पूजा करून सवाद्य मिरवणूक काढणारा बळीराजा आजचा बेंदूर सण आनंदाने साजरा करत आहे.
#satara
#vaduj
#bailgadasharyat
#satarabailgadasharyat
#balma
#sataraexpressbalma
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 11th Jul 2022 05:12 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 11th Jul 2022 05:12 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 11th Jul 2022 05:12 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 11th Jul 2022 05:12 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 11th Jul 2022 05:12 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 11th Jul 2022 05:12 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Mon 11th Jul 2022 05:12 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Mon 11th Jul 2022 05:12 am











