पोट व कंबरेची चरबी मेणासारखी झपाट्याने वितळेल, पाण्यात मिसळून प्या ही 5 पाने

Plants leaves for weight loss burn fat

: बरेचदा असे दिसून येते की काही लोक कॅलरीज कमी करून, कठोर व्यायाम करून आणि आहारावर नियंत्रण ठेवूनही वजन कमी करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला आढळणा-या काही प्रकारच्या पानांचा आधार घेऊ शकता. अशी काही पाने आहेत, जी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळू शकतात.

लठ्ठपणा एक गंभीर समस्या आहे जी केवळ आपले सौंदर्यच खराब करत नाही तर आपल्याला अनेक आजारांनी ग्रस्त करते जसे की मधुमेह, कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर आणि एवढेच नाही तर लठ्ठपणामुळे कोरोना संक्रमण होण्याचा धोका सुद्धा बळावतो असे दिसून आले आहे. लठ्ठपणाच्या विळख्यात फसलेल्या लोकांसाठी वजन कमी करणे ( ही एक मोठी समस्या ठरते. वजन कमी कसे करावे हा प्रश्न नेहमीच त्यांच्या मनात रेंगाळत असतो. अशावेळी अनेक उपाय ट्राय केले जातात. आहारातून कॅलरीज कमी केली जाते, कठोर व्यायाम केला जातो आणि डायट कंट्रोलसाठी कसोशीने प्रयत्न केले जातात. पण एवढे करून सुद्धा वजन काही कमी होत नाही.

जर तुम्ही सुद्धा या स्थितीतून जात असाल तर तुम्ही काही स्पेशल घरगुती उपाय करून बघू शकता. मणिपाल हॉस्पिटल पटियाला येथील डाएटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. भावना शर्मा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजुला सहज मिळणारी काही प्रकारची पाने घेऊ शकता. ही अशी काही पाने आहेत जी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात किंवा बाल्कनीत मिळू शकतात आणि ती वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. ही पाने, त्यांचे उपयोग आणि त्यांचे फायदे खाली स्पष्ट केले आहेत.

पटियाला स्थित मणिपाल हॉस्पिटल्समधील डाएटिशियन आणि नूट्रिशनिस्ट डॉ. भावना शर्मा यांनी वजन कमी करण्यासाठी आपण काही वनस्पतींचा आधार घेऊ शकतो असे सांगितले आहे. त्यापैकी एक म्हणजे कोथिंबीरीची पाने होय. कोथिंबीर केवळ आहारातील स्वादच वाढवत नाहीत तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते आणि जेवणाला छान रंग व लुक देते. कोथिंबीरीच्या पानांत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात आणि वजन नियंत्रित राखण्यात सुद्धा मदत होते. या पानांमध्ये फोलिक अॅसिड, मॅग्नेशिम, व्हिटॅमिन बी अधिक प्रमाणात आढळते. यात क्वर्सेटिन नावाचा पदार्थ असतो जो वजन कमी करण्यात मदत करतो. याची तुम्ही चटणी किंवा सॅलेड बनवून खाऊ शकता.

भारतीय घरांमध्ये तुळस खूप पवित्र मानली जाते. या वनस्पतीमुळे आरोग्याला खूप फायदे मिळतात. तुळशीच्या पानांचा स्वाद सुद्धा काहीसा वेगळा पण छान असतो. तुम्ही ही पाने कच्ची सुद्धा खाऊ शकता. तुळशीच्या पानांचा चहा हे एक हेल्दी पेय आहे जे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सकाळी पाण्यात 5 ते 6 तुळशीची पाने टाकून ते पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात आणि मेटाबॉलिज्म वाढते. मेटाबॉलिज्म वाढल्याने कॅलरी बर्न करणे सोप्पे होते व वजन कमी होते. याव्यतिरिक्त तुळशीची पाने नैसर्गिकरित्या पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.

 

पालकची भाजी ही सर्वात हेल्दी भाज्यांपैकी एक आहे. यात आयर्न आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते. पालक खाल्ल्याने शरीराला खूप फायदे मिळतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, केस तुटणे थांबते, डोळ्यांची दृष्टी सुधारते. शिवाय वजन कमी करण्यात मदत होते हे विशेष! यासाठी तुम्ही आहारात केवळ एक कप पालकचा समावेश करायचा आहे. पालकचा वापर तुम्ही विविध भाज्यांत, ड्रिंक्समध्ये आणि स्मुदीमध्ये करू शकता. त्यात फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते आणि फायबर आणि लोह भरपूर असते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास, हाडे निरोगी ठेवण्यास आणि चांगली दृष्टी राखण्यास मदत करते.

कडूनिंबाचा रस प्यायल्याने विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांशी लढण्यात मदत होते. कडूनिंबाचा रस तुम्ही कडूनिंबाच्या ताज्या पानांमधून काढू शकता. या पानांची पेस्ट सुद्धा बनवता येते. कडूनिंबाचा रस नियमित प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते, पचनक्रिया सुरूळीत राहते, पोट साफ होते. कडूनिंबामुळे शरीरातील फॅट कमी होते आणि वजन व चरबी जळण्यास मदत होते. कडूनिंब, लिंबू आणि मध यांचे एकत्रित सेवन मेटाबॉलिज्म वाढवण्यात मदत करते.

कडीपत्ता हा दक्षिण भारतीय व्यंजनामधील एक महत्त्वपूर्ण पदार्थ आहे जो वजन कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतो. कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि वनस्पतीपासून प्राप्त होणारे पोषक तत्व जसे की लठ्ठपणा कमी करण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी, लिपिड रोखणारे आवश्यक गुणधर्म असतात. याशिवाय एल्केलॉयड, महानिंबाईन हे महत्त्वपूर्ण तत्व कडीपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे फॅट कमी होते, मेटाबोलिक रेट वाढतो आणि शरीरातील फॅट कमी होते. शिवाय हे रक्त साफ करते आणि डायबिटीजसाठी एखाद्या रामबाण औषधाप्रमाणे काम करते.


टीप : ही एक सामान्य माहिती असून सातारा न्युज यातून कोणताही दावा करत नाही. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात योग्य ते बदल करावा.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला