मुख्यमंत्र्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : सुशांत मोरे
राज्यपालांचा आदेश डावलून खोट्या कागदपत्रांचा पर्दाफाशSatara News Team
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राज्य शासनाच्या जलसंधारण महामंडळाकडील ६१९१ कोटी रूपयांच्या मंजूर कामे रद्द करण्यात आली होती. ती सर्व कामे स्थगित दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून राज्याचे मुख्य सचि मनुकुमार श्रीवास्तव आणि प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सु. पां. कुशिरे यांनी संगनमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. राज्यपालांचे आदेशाचा भंग करून करण्यात आलेल्या कागदपत्राने मुख्यमंत्री अडचणीत येवू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: पडताळणी करून लक्ष घालून संबंधीत अधिका-यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा व योग्य प्रकारे याबाबत निर्णय घ्यावा. याबाबत योग्य निर्णय न झालेस जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.सुशांत मोरे यांनी दिली.
सुशांत मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, दि. ८ जुलै २० २ २ रोजी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील प्रत्यक्ष सुरवात न झालेल्या कामांच्या सर्व स्तरावरील निविदा रद्द करणेबाबत महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशानुसार अव्वर सचिव महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय क्र. मजम २०२२/ प्र.क्र. १४३ / जल-३ मंत्रालय मुंबई असा शासन निर्णय झाला होता. त्यानंतर श्री. सु. पां. कुशिरे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ आणि प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई व राज्याचे मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडून दि. १०/११/२०२२ रोजी टिपणी काढून मागील शासनाच्या काळात मंजूर केलेल्या अनेक कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. अशी स्थगिती देण्याचा राज्यशासनाचा निर्णय मा.उच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आला असून मा. उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील याचिकांची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर स्थगिती आदेश कायम ठेवावेत किंवा उठवावेत याबाबत कृपया आदेश व्हावेत असे मसुदा तयार करून त्यावर मुख्य सचिव यांनी सही केली आहे आणि त्याखाली मा. मुख्यमंत्री यांनी सोबत जोडलेल्या विवरण पत्रातील कामावरील स्थगिती उठवण्यात येत आहे असे लिहून स्वतःची सही केली आहे. वास्तविक या कामांना स्थगिती नव्हती ती राज्यपालांच्या वटहुकुमाने रद्द झाली होती आणि त्याखाली प्रधान सचिव मृद व जलसंधारण यांनी स्व:ची सही करून पुढील कार्यवाहीस्तव सादर केले आहे.
मात्र मा. राज्यपाल यांचा अद्यादेश दि. ८ जुलै २०२२ कोठेही रद्द केला नाही. अथवा स्थगिती उठवण्याबाबतचे कोणताही शासन निर्णय मा. राज्यपाल यांच्या सहीने अद्यापपर्यंत मंजूर झालेला नाही. सदरचा अद्यादेश रद्द करून राज्यपालांच्या आदेशाने नवा वटहुकुम काढावा असे गरजेचे होते. मात्र तशी कोणतीही कृती न करता खोटी कागदपत्रे तयार करून मुख्यमंत्र्यांच्या सहीने कामांना आदेश दिले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. गतिशील व कृतिशील कार्य त्यांच्याकडून सुरू आहे. काही अधिकारी त्यांच्या या गतिशील कारभाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मा. मुख्यमंत्री यांनी सही करताना कायदेशीर सल्लागारांमार्फत माहिती घेवूनच सही करावी अशी विनंती मी याद्वारे त्यांना करीत आहे. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांनी मुख्य सचिव आणि प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई व व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. याकामी मी मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल आणि मा. पोलिस महासंचालक यांना पत्र देवून याकामी उचित कारवाई करावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लेखी पत्राद्वारे ईमेल वर कळविले आहे.
मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे आहेत. राज्याची सेवा करण्याची संधी चौथ्यांदा मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मिळाली आहे. सातारा जिल्ह्याला मोठा विकास निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्याचा हा सुपुत्र अडचणीत येवू नये यासाठी मी आक्रमक भूमिका घेणार आहे. एकनाथ शिंदे यांनी अशा घरभेद्यांपासून सावध रहावे. जलसंधारण खात्यातील प्रधान सचिव श्री. डवले व व्यवस्थापकीय संचालक श्री. कुशिरे हे मालक झाले आहेत. कशाही टिपण्या तयार करायच्या व मुख्यमंत्र्यांची सही घेवून कशीही कामे करायची. त्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येवू शकतात. माझ्या सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री अडचणीत येवू नये म्हणून माझी ही तळमळ आहे, असे सुशांत सुभाष मोरे यांनी म्हटले आहे.
sushantmore
cmo
#cmomaharashtra\
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 8th Jan 2023 05:59 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 8th Jan 2023 05:59 pm









