राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेमध्ये एल.बी.एस. कॉलेजला तीन सुवर्णपदके.
कोमल वाघ / पवार
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
- बातमी शेयर करा
सातारा : लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय हे सातारा शहरातील एक नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयाने अनेक खेळामध्ये राष्ट्रीय,आंतरराष्ट्रिय स्पर्धेत उत्तुंग भरारी मारली आहे. खेळाची परंपरा कायम राखत आर्चरी खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदक मिळविले आहेत. दिनांक आठ ते 11 डिसेंबर २०२३ रोजी नाडियाड गुजरात येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये कंपाउंड राउंड प्रकारात प्रांजल वाईकर यांनी सांघिक सुवर्णपदक व इंडियन राउंड प्रकाश स्वराज जंगम यांनी सुवर्णपदक मिळविले . लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील कु. आदिती स्वामी ,कु . प्रांजल वाईकर, स्वराज जंगम यांनी राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून एलबीएस कॉलेजने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही . शेजवळ यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रा. मेजर मोहन वीरकर डॉ. विकास जाधव , प्रा शिरीष ननावरे व श्री प्रवीण सावंत, शिवशंकर चोराटे यांचे मार्गदर्शन लाभले या खेळाडूंचे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या मा. सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, ज्यु. विभाग प्रमुख सौ. व्ही.एस.शिंदे व प्रा.सुनील शिंदे तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांनी सर्व खेळाडूच्या उत्तुंग यशासाठी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 19th Dec 2023 03:25 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 19th Dec 2023 03:25 pm











