एल.बी.एस कॉलेजच्या प्रथमेश माने चे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये यश
कोमल वाघ-पवार - Sat 19th Aug 2023 01:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा : लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा खेळाडू प्रथमेश संजय माने बारावी सायन्स यांनी भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. या स्पर्धा इंडियन पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वजनी गटामध्ये एकूण 400 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता प्रथमेश माने यांनी 105 के.जी. वजन गटात बेन्च आणि डेडलिफ्ट असे एकूण 304 किलोग्रॅम वजन उचलून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच प्रा. मेजर मोहन वीरकर, प्रा. डॉ. विकास जाधव, प्रा. शिरीष ननवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या मा.सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, ज्यु. विभाग प्रमुख सौ. व्ही.एस.शिंदे व प्रा.सुनील शिंदे तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांनी त्याच्या या उत्तुंग यशासाठी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sat 19th Aug 2023 01:00 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sat 19th Aug 2023 01:00 pm













