क्रेन इंडियाच्या नव्या व्हॉल्व कारखान्याचे साताऱ्यामध्ये उदघाटन पार
प्रकाश शिंदे - Wed 28th Sep 2022 11:47 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा २८ सप्टेंबर २०२२: क्रेन इंडिया च्या सातारा येथील नव्या इंजिनिअर्ड चेक व्हॉल्व कारखान्याचे उदघाटन आज पार पडले. या समारंभाचे आयोजन क्रेन प्रोसेस फ्लो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि., केमफार्मा अँड एनर्जी, ड्युओ चेक आणि नोझ चेक या क्रेन च्या विविध विभागातर्फे करण्यात आले होते . क्रेन इंडिया चे अध्यक्ष श्री हरी जिनागा यांच्या नेतृत्वाखाली आणि क्रेन च्या जागतिक स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांच्या तसेच व्यावसायिक भागीदारांच्या आणि ग्राहकांच्या उपस्थितीत पूर्णतः इंजिनिअर्ड चेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी उभारलेल्या या कारखान्याचे उदघाटन करण्यात आले .
या नवीन कारखान्यात १०० व्यक्तींसाठी रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्याचा लाभ रसायन उद्योग तसेच ऊर्जा क्षेत्र, पुनर्वापर योग्य ऊर्जा तसेच हायड्रोजन उत्पादन यासारख्या अनेक नव्या उद्योगक्षेत्रांना मिळणार आहे . ११०, ००० क्षेत्रफळामध्ये या कारखान्याची रचना करण्यात आली आहे स्वयंचलित वेल्डिंग तंत्रज्ञान वापरून येथे ड्युओ चेक आणि नोझ चेक व्हॉल्व च्या ८४ इंच पर्यंतच्या श्रेणीचे उत्पादन येथे करण्यात येणार आहे. उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीचे मशिनिंग याच कारखान्यात करण्याची कारखान्याची क्षमता आहे. कारखान्यात ७२ इंच पर्यंतच्या व्हॉल्व्ह च्या हाय प्रेशर आणि क्रायोजेनिक चाचण्या घेण्याची सोय आहे. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार तापमान, दाब, गळतीचे प्रमाण अशा चाचण्यांचे प्रमाणपत्रही उपलब्ध होऊ शकेल.
नव्या चेक व्हॉल्व कारखान्याच्या उद्घाटनाबरोबरच कंपनीने माहेर निवासी संकुल या सातारा जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठीच्या वसतिगृहाचे उद्घाटन करुन आपली समाजाबद्दलची भावना दृढ केली आहे. माहेर या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे वसतिगृह चालवले जाईल .
क्रेन इंडिया चे अध्यक्ष हरी जिनागा म्हणाले की नव्या इंजिनियर्ड चेक व्हॉल्व कारखान्यात सर्वोत्तम पातळीची यंत्रणा बसविण्यात आली असून डिजिटल परिवर्तनाचे प्रवाह त्यात प्रतिबिंबित झालेले आहेत. येथील उत्पादन पूर्णतः स्वयंचलित असून क्रेन ची सर्वज्ञात गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल गेली ३० वर्षे स्थानिक लोकांच्या हितासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूक करुन आणि अन्य मार्गांनी योगदान देऊन भारतीय समाजात एक प्रभावी संस्था म्हणून स्थान मिळविले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 28th Sep 2022 11:47 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 28th Sep 2022 11:47 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 28th Sep 2022 11:47 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 28th Sep 2022 11:47 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 28th Sep 2022 11:47 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 28th Sep 2022 11:47 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Wed 28th Sep 2022 11:47 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Wed 28th Sep 2022 11:47 am











