साताऱ्यात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापणार
अजित पवार, देवेंद्र फडणवीस ,शरद पवार साता-यात.Satara News Team
- Sat 4th May 2024 09:25 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात आज राज्यातील प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा हाेणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींमुळे आज साता-यात राज्यातील दिग्गज नेते काय बाेलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता मतदारांमध्ये लागली आहे.
खासदार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांचा मोठा प्रभाव असलेल्या वाई मतदार संघामध्ये अजित पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात दुपारी दोन वाजता बाजार समिती मैदानावर सभा होणारअसून या सभेनंतर उपमुख्यमंत्री सातारा शहरातील तालीम संघावर जाहीर सभा घेणार आहेत.
त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांची मागच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पावसातील सभा स्थळावर होणार असून या सभेत शरद पवार मतदारांना कोणती साथ घालणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या चार सभांमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण मात्र तापलेले आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 4th May 2024 09:25 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 4th May 2024 09:25 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 4th May 2024 09:25 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 4th May 2024 09:25 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 4th May 2024 09:25 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 4th May 2024 09:25 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Sat 4th May 2024 09:25 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sat 4th May 2024 09:25 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 4th May 2024 09:25 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sat 4th May 2024 09:25 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 4th May 2024 09:25 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 4th May 2024 09:25 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 4th May 2024 09:25 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 4th May 2024 09:25 am













