सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या सरी लागल्या बरसू.
पावसामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरणSatara News Team
- Fri 1st Jul 2022 11:18 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज : संपूर्ण जून महिना जडी मारून बसलेल्या मान्सूनच्या पावसाने मात्र आज शुक्रवारी पहाटेपासून आपली हजेरी सातारा जिल्ह्यात सर्व दूर लावली आहे. रात्री उशिरा सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण पाऊस सुरू झाल्याशिवाय शेतीची कामे, मशागती अथवा पेरण्या करू नका असा आदेश मागील मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी स्वतः दस्तूर खुद्द दिल्यामुळे अनेक पेरण्या रखडल्या आणि पाऊसही लांबल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र केवळ काळे गडद रंगाचे ढग आकाशातून पळताना लांबलेला पाऊस, वाढत्या उन्हाची तगमग यामुळे पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांना मात्र तोंडचे पाणी पळवावे लागले होते. मात्र ,आता सुरू झालेल्या या मान्सून पावसाने संपूर्ण चित्रच बदलले असून सातारा शहर परिसरामध्ये सखल भागामध्ये पावसाची डबकी साचली आहे. तर घरोघरी अडगळीत ठेवलेल्या रेनकोट, छत्री यांच्या पिशव्या आता बाहेर निघाले आहेत. सातारा जिल्ह्यात पावसामुळे पूर्णपणे पावसाळी वातावरण दिसून येत आहे .
सध्या सातारा जिल्ह्यात मार्गक्रमण करणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातही या मान्सून सरी बर असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पसरले आहे. आज फलटण येथे दोन दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी विसावली तरीसुद्धा वारकऱ्यांनी पावसामुळे चिखल आणि दलदलीतही आपली जागा शोधत दोन दिवसाच्या निवाऱ्यासाठी सोय केलेली दिसून येत होती.
rain
cmmhaharashtr
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 1st Jul 2022 11:18 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 1st Jul 2022 11:18 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 1st Jul 2022 11:18 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 1st Jul 2022 11:18 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 1st Jul 2022 11:18 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Fri 1st Jul 2022 11:18 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 1st Jul 2022 11:18 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 1st Jul 2022 11:18 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 1st Jul 2022 11:18 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 1st Jul 2022 11:18 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 1st Jul 2022 11:18 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 1st Jul 2022 11:18 am











