घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे.
Satara News Team
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : घरात बसून दुसऱ्यांवर टीका करणारा नव्हे तर तुमचे प्रश्न सभागृहात मांडणारा, आवाज उठवून मार्गी लावणारा प्रतिनिधी महाबळेश्वरचे मतदार निवडून देतील. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. यापुढेही घेणार आहोत. येणार्या काळात महाबळेश्वरचा खुंटलेला विकास नक्कीच करून दाखवू, असा विश्वास प्रभाग क्रमांक 8 अ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ.स्वप्नाली कुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या प्रचाराच्या रणधुमाळी मुळे वातावरण चांगलेच तापले आहे. माजी नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून गिरिस्थान नगर विकास आघाडी (नियोजित) तर्फे नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभागामध्ये त्यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून प्रचार फेरीत नागरिकांच्या गाठीभेटी घेताना त्या बोलत होत्या.
यावेळेस पुढे बोलताना त्या म्हणाल्या, २०१६ च्या गतपंचवार्षिक निवडणुकी मध्ये महाबळेश्वरच्या जनतेने मला प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्षा म्हणून निवडून दिले. मी विविध विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर विविध प्रभागांमध्ये समस्या देखील मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. परंतु जागतिक महामारी (कोविड) आली आणि जणु जगच थांबले. या अडचणीच्या काळात मी जनतेची साथ सोडली नाही. ज्या जनतेने मला नगराध्यक्षा बनवले त्या जनतेची मी उपासमार कशी होऊ देऊ? मानवता धर्म मी त्या ठिकाणी जाणला. व स्वखर्चाने मी गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी मोफत अन्नधान्य (फुडकिट) वाटप केले. लोकांना दवाखान्यासाठी देखील खूप मदत केली आहे. कोविड काळ आला व त्यानंतर आमच्या मुदती संपल्याने आम्हाला विकासकामे पूर्णत्वाकडे नेता आली नाहीत.
आमच्या विरोधी सदस्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभांना येण्याचे टाळले. तब्बल दीड वर्ष हे सदस्य पालिकेत सभांना आलेच नाहीत. ज्या जनतेने त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठवले हे विरोधी सदस्य त्यांचे कर्तव्यच विसरले. वैचारिक विरोध नक्की असावा, परंतु विरोधाला विरोध नसावा. जनतेला वेठीस धरण्याचे काम गत पंचवार्षिक मध्ये विरोधकांनी केले.
आता जनता अशा सर्व माजी सदस्यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहणार का? तुम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवक म्हणून काय केले? महाबळेश्वर जनता ही सुज्ञ आहे त्यांना सर्व माहित आहे, असेही स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक आठ मध्ये मतदारांशी संवाद साधताना सौ. स्वप्नाली कुमार शिंदे यांना मतदारांचा वारसा प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 26th Nov 2025 06:08 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 26th Nov 2025 06:08 pm













