माण पंचायत समितीच्या इमारतीला गळती,इमारत पडण्याच्या मार्गावर
कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या जीवाला धोकाएकनाथ वाघमोडे
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
- बातमी शेयर करा

माण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने सदरच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे,परंतु अद्याप तो शासन दरबारी तसाच पडून आहे,त्यामुळे हे काम रखडले आहे,प्रस्ताव मंजूर व्हावा अशी आमची ही इच्छा आहे सर्जेराव पाटील गटविकास अधिकारी माण पंचायत समिती
माण : माण तालुका पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागली असून ती इमारत पडण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर सदर इमारतीची वैधता देखील संपून गेली असल्याने ती नादुरुस्त इमारत कधीही कोसळून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु संबंधित अधिकारी आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कामचुकारपणामुळेच पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांसह तिथं असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.माण तालुका पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यशैलीवर आधीच नागरिकांचा आक्षेप असतानाच सदर इमारतीची झालेली दुर्दशा पाहता तिथे आपल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तर सर्व काही दिसत आहे परंतु हे प्रशासनाच्या अजूनही का लक्षात आले नाही ? सदर इमारतीची दुरुस्ती अजूनही का झाली नाही? संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना हे दिसत नाही का? माण पंचायत समितीचा बांधकाम विभाग काय करत आहे, असे सवाल जनतेच्या माध्यमातून उमटताना दिसत आहेत.सदर गोष्टीची दखल घेऊन इमारतीच्या दुरुस्तीची तजवीज माण पंचायत समितीचे बांधकाम विभाग करणार की इमारत कोसळून एखाद्याला जखमी होण्याची किंवा जीव गमावण्याची वेळ येण्याची वाट पाहणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
संबंधित बातम्या
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sat 3rd Sep 2022 10:33 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Sat 3rd Sep 2022 10:33 am