BREAKING : साताऱ्यात केळवली धबधब्यात युवक बुडाला

शोध सुरु; शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल

सातारा : सातारा तालुक्यात केळवली धबधबा या ठिकाणी एक युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल सुभाष माने हा युवक साताऱ्यातील विकास नगर या ठिकाणी राहणारा असून तो त्याच्या अन्य तीन मित्रांसह केळवली धबधबा या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पर्यटनासाठी गेला होता. मित्रांसोबत धबधब्यात पोहोच असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या सहकार्याने पाण्यामध्ये उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने राहुल माने हा बुडाला आहे. दरम्यान, काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेल्या राहुल मानेला शोधण्यासाठी ग्रामस्थ पोलीस आणि रेस्क्यू टीम कसोशीने प्रयत्न करत आहे. या घटनेने पर्यटन स्थळांवर पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे. वनविभाग आणि जिल्हा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर ग्रस्त वाढवण्याची मागणी देखील आता जोर धरू लागली. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला